आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म! घरातच सापडला आरोपी, नाव ऐकून सरकली कुटुंबियांच्या पायाखालची वाळू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा - ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे एका 12 वर्षांच्या मुलीला असह्य पोटदुखीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासानंतर दिलेली माहिती ऐकून कुटुंबियांना धक्काच बसला. ही मुलगी गर्भवती असून थोड्याच वेळात बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले. त्याच दिवशी तिने एका सुदृढ बाळाचा जन्म दिला. यानंतर आई-वडील आणि डॉक्टरांनी पोलिसांना बोलावले. मुलीला विचारणा करण्यात आली तेव्हा आपल्या गेल्या वर्षभरापासून अत्याचार सुरू असल्याचे तिने सांगितले. यानंतर तिने आरोपीचे नाव सांगितले, तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची वाळूच सरकली.


सावत्र अल्पवयीन भावाकडूनच झाले शोषण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी तिच्याच घरात राहणारा 14 वर्षांचा सावत्र भाऊ आणि ती गेल्या वर्षभरापासून शारीरिक संबंध बनवत होते. पहिल्यांदा संबंध बनवले तेव्हा ती 11 वर्षांची होती आणि सावत्र भाऊ फक्त 13 वर्षांचा होता. घरातच गेल्या वर्षभरापासून हे सर्व सुरू होते, तरीही आई-वडिलांचे त्यावर कधीच लक्ष गेले नाही.


तिला कळलेच नाही आपण गर्भवती आहोत...
इतक्या लहान वयात आपण काय करत आहोत याची जाणीवही त्या दोघांना नव्हती. त्याचे परिणाम काय होतील याचा तर त्यांनी विचारही केला नव्हता. पोलिस तपासात त्या मुलीला गर्भधारणा झाल्याची सुद्धा माहिती नव्हती. आपण गर्भवती आहोत हे बाळाला जन्म देतानाच तिला कळाले होते.


पर्थ येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, हे प्रकरण अतिशय गंभीर आणि नाजूक आहे. यात आरोपी कोण आहे किंवा त्याने काय केले यापेक्षा त्या तिन्ही मुलांसाठी काय करता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्या दोघांनी आपल्या मर्जीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले तरीही त्यांचे वय 16 वर्षांपेक्षा कमीच आहे. अशात त्यांना यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यांच्यावर कारवाई करून सुधारगृहात पाठवले जाऊ शकते. परंतु, समाजात याचा काय संदेश जाईल याचा विचार केला असता न्यायालय त्यांच्यावर कारवाई करणार नाही. आई फक्त 12 वर्षांची तर वडील केवळ 14 वर्षांचा आहे. त्यामुळे, न्यायालय, कुटुंब आणि सामाजिक संस्थांकडून त्यांना मदत करून पुनरवसन करण्याचे काम सध्या केले जात आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...