आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केडगावमध्ये अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

आडगाव येथील पंधरा वर्षांची मुलगी क्लासला जात असताना तिची शुभम नावाच्या मुलाशी ओळख झाली. त्यानंतर त्या मुलाने विश्वास संपादन करत तिला चास येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम दिघे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक उपनिरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.