आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरून मैत्री करत पंधरा वर्षीय मुलीवर नराधमाने केला अत्याचार; मोबाइलमध्ये केले चित्रीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- फेसबुकवरून मैत्री करत पंधरा वर्षीय मुलीवर नराधमाने अत्याचार केला. त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करत ते सार्वजनिक करण्याची धमकी देत सात लाख घेऊन मुलीशी लग्न करणारा २५ वर्षीय विवाहित तरुण राहुल कल्याण बोंगाणे याच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत (२६ डिसेंबर) वाढ करण्याचे, तर त्याचा पिता कल्याण भाऊराव बोंगाणे याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सोमवारी (२४ डिसेंबर) दिले. 


या प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये आरोपी राहुल बोंगाणे (२५, रा. जाधववाडी) याने फेसबुकवरून मैत्री करून नववीत शिकणाऱ्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला फिरायला नेऊन १३ जानेवारी २०१८ रोजी तिच्यावर बलात्कार केला व त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरणही केले. ते चित्रीकरण सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपीने पुन्हा मुलीवर दौलताबाद व जाधववाडी येथे अत्याचार केला. १२ फेब्रुवारी रोजी त्याने मुलीच्या आईला मोबाइलमधील चित्रीकरण दाखवून मुलीशी लग्न लावून द्या, असे धमकावले. तसेच सात लाख रुपये हुंडा घेऊन २० फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्यातील शंभू सावरगाव येथे मंदिरात लग्न लावून देण्यास भाग पाडले. अवघ्या काही दिवसांत राहुलचे पहिले लग्न झाले असून त्याला मुलगा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी राहुल व त्याचे वडील कल्याण भाऊराव बोंगाणे (५१) यांना २१ डिसेंबर रोजी अटक करून कोर्टात हजर केले असता दोघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना कोर्टात हजर केले असता राहुलच्या पोलिस कोठडीमध्ये बुधवारपर्यंत वाढ करण्याचे, तर त्याचा पिता कल्याणची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याचे आदेश कोर्टाने दिले. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी काम पाहिले. 
 

 

बातम्या आणखी आहेत...