आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Accuses Boy Of Forced Conversion After Inter Religious Love Marriage In Ranchi

धर्म बदलून केला मुस्लिम प्रियकराशी विवाह: सासऱ्याने केली अशी Demand की तरुणीने गाठले पोलिस स्टेशन; म्हणाली, पतीलाही तुरुंगात टाका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - येथे राहणाऱ्या एका हिंदू तरुणीने आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन धर्म परिवर्तन केले. तसेच एका मुस्लिम युवकाशी पळून विवाह देखील केला. परंतु, ती सासरवाडीत पोहोचली तेव्हा तिला आपल्या पतीचे खरे रुप दिसले. सासरवाडीत जाताच सासू आणि सासऱ्याने तिच्यावर प्रतिबंधित मांस खाण्यास सांगितले. तिने खाण्यास नकार दिला आणि पतीला मदत मागितली. तेव्हा पतीने तिची साथ दिली नाही उलट घर सोडून निघून गेला. हे दोघे शाळेत 7 व्या वर्गात होते तेव्हापासून दोघांचे प्रेम होते. ज्याच्यासाठी धर्म बदलला, आई-वडिलांना सोडले त्याने आपल्याला दगा दिल्याचे पाहून तरुणीने थेट पोलिस स्टेशन गाठले. तसेच सासरच्या मंडळीसह पतीला सुद्धा शिक्षेची मागणी ती करत आहे. 

 
गेल्या महिन्यात झाला प्रेमविवाह
ज्योति कुमारीने 23 ऑगस्ट रोजी आपला प्रियकर मोहसीनसाठी घर सोडले होते. दुसऱ्याच दिवशी अर्थात 24 ऑगस्ट रोजी ज्योतीने आपले धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. याच दिवशी दोघांचा निकाह देखील झाला. यानंतर 25 ऑगस्ट रोजी ज्योतीच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. मोहसीन नावाच्या मुलाने आपली मुलगी ज्योतीचे अपहरण करून बळजबरी तिचे धर्म परिवर्तन केले असा आरोप वडिलांनी लावला होता. 

 

अधिकृत तक्रार नाही...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांकडून तक्रार मिळाल्यानंतर ज्योतीचा जबाब नोंदवण्यात आला. तिने आपले धर्म परिवर्तन आणि निकाह दोन्ही आपल्या मर्जीने झाल्याचे म्हटले. एवढेच नव्हे, तर आई-वडिलांसोबत जाण्यास नकार देत ती पती मोहसीनच्या घरी राहण्यासाठी निघून गेली. यानंतर ज्योतीने आपल्याला सासरवाडीत प्रतिबंधित मांस खाण्यासाठी दबाव टाकण्यात आला असे म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर ती आता आपल्या वडिलांच्या घरी पोहोचली. तरुणी आरोप लावत असली तरीही तिने अद्याप आपल्या पतीच्या विरोधात अधिकृत एफआयआर दाखल केला नाही. 


पतीला शिक्षा मिळायलाच हवी -ज्योती
ज्योतीने सांगितल्याप्रमाणे, "मोहसीनशी विवाह करण्यासाठीच तिने आपला धर्म बदलला. परंतु, त्याच्या घरी गेल्यानंतर मला प्रतिबंधित मांस खाण्यासाठी सांगितले जाईल याचा विचारही केला नव्हता. त्यांनी माझ्यावर ते खाण्यासाठी दबाव टाकला. मी सातवीला होते तेव्हापासून मोहसीन आणि माझी मैत्री आहे." तीन महिन्यांपूर्वीच ती 18 वर्षांची झाली. यानंतर दोघांनी लग्नाचा विचार केला. आता ज्योती आपल्या वडिलांनी केलेल्या आरोपांशी सहमत आहे. मोहसीनने यापूर्वी काहीच सांगितले नाही. परंतु, जेव्हा त्याच्यासोबत लग्नासाठी गेले तेव्हा त्याने माझा धर्म बदलला असे आरोप तिने लावले. सोबतच मोहसीनला दगा दिल्याप्रकरणी शिक्षा मिळालायच हवी अशी मागणी तिने लावून धरली आहे.

बातम्या आणखी आहेत...