आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीला आपल्यापेक्षा जास्त मार्क मिळाल्याचा असा घेतला सूड, बॉयफ्रेंडच्या नावावर केला हा कारभार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटियाला (पंजाब) | शहरातील एका प्रायव्हेट कॉलेजमधील दोन मैत्रिणी. एक मैत्रिण अभ्यासात हुशार तर दूसरी एव्हरेज. यावेळी बीए फायनल ईयरमध्ये जेव्हा एका मैत्रिणीला जास्त मार्क मिळाले तर मागे राहणा-या दूस-या मैत्रिणीने तिचा सूड घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने तिच्या बॉयफ्रेंडला मोहरा बनवले. तिने बॉयफ्रेंडच्या आयडी प्रूफवर सिम कार्ड घेऊन मैत्रिणीचे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट बनवले. तिच्या ख-या फेसबुक अकाउंटवरुन तिचे सर्व फोटोज घेऊन ते फोटोशॉपमध्ये एडल्ट बनवून तिने बनावट अकाउंटवर अपलोड केले. येथे सूड घेणारी मैत्रिण, तिचा बॉयफ्रेंड आणि पीडिता हे कॉमन फ्रेंड होते. यामुळे बॉयफ्रेंडला त्याच्या आयडी प्रुफचा गैरवापर होतोय, यावर जराही संशय आला नाही. तो स्वतः पीडितेला न्याय देण्यासाठी पोलिस ठाण्यात फे-या मारु लागला. परंतू बनावट अकाउंटचा आयपी अॅड्रेस तपासण्यात आला तेव्हा तो नंबर त्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडच्या नावावर असल्याचे कळाले. तेव्हा तो चकीत झाला. यानंतर पोलिसांनी आरोपीला विचारपुस केली तेव्हा सत्य समोर आले. सध्या पोलिसांनी बॉयफ्रेंडलाही आरोपी ठरवून केस दाखल केली आहे. परंतु पीडितेचे कुटूंब बॉयफ्रेंडवर कारवाई करण्यास तयार नाही. या संपुर्ण प्रकरणामुळे सोशल मीडियाच्या वापराविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत.


अभ्यासात स्पर्धा करणारी मैत्रिण, तिने कधी सूड घेतला कळाले नाही
राघोमाजरा परिसरातील एका तरुणीने याचवर्षी शहरातील एका प्रायव्हेट कॉलेजमधून याचवर्षी बीएची परिक्षा दिली. या तरुणीच्या तक्रारीवरुन कोतवाली पोलिसांनी पातडा परिसरातील एका तरुणी आणि संगरुर परिसरातील तरुणाविरुध्द आयटी अॅक्टनुसार तक्रार दाखल केली. पीडित तरुणीने सांगितले की, तिच्यासोबत शिकणारी एक मैत्रिण अभ्याविषयी तिच्यासोबत नेहमी स्पर्धा करायची. परंतु प्रत्येकवर्षी मलाच जास्त मार्क मिळत होते. या स्पर्धेने कधी गुन्हेगारीचे रुप घेतले हे तिला कळाले नाही. एकदा तिला कुणीतरी सांगितले की, तिच्या नावावर फेसबुक-इंस्टाग्रामवर एका अकाउंटवर तिचे वादग्रस्त फोटोज अपलोड झाले आहेत. तिला यावर विश्वास बसला नाही. तिने स्वतः फेसबुक ओपन करुन पाहिले तेव्हा ती चकीत झाली. तिने घरच्यांना घाबरत घाबरत सांगितले. घरच्यांनी तिला सपोर्ट केला आणि पोलिसांत तक्रार केली. 

 

दरम्यान, मैत्रिणीचा बॉयफ्रेंड पीडितीचा कॉमन फ्रेंड होता आणि तिचा नातेवाईकही होता. तोसुध्दा पीडितेला मदत करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये फे-या मारत होता. आपली गर्लफ्रेंड असे काम करेल याचा त्याला जराही अंदाज नव्हता. परंतु पोलिसांनी जेव्हा सिमचा आयपी अॅड्रेस चेक केला आणि यामध्ये त्याचे नाव निघाले तेव्हा तो चकीत झाला. त्याला थोडा वेळ काहीच कळाले नाही. चौकशी केल्यावर समजले की, काही दिवसांपुर्वी त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला आधार कार्ड नंबर मागितला होता. नंतर संशयाची सुई त्या आरोपी मैत्रिणीवर आली त्यानंतर सत्य समोर आले. आता पोलिस लवकरच त्या तरुणीला चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये बोलावणार आहेत. दोघांवरही कारवाई केली जाईल. कारण यानंतर अशी हिंमत कुणीरी करु नये. 

गाउडलाइन : पर्सनल फोटो शेअर करु नका, सेटिंग्समध्ये काही बदल करा 
फेसबुककडूनही सध्या काही पाऊल उचलले जात आहे. यामुळे तुमचा डाटा कुणी तिसरा अॅक्सेस करु शकणार नाही. तुम्ही फेसबुकवर लॉग इन सेटिंगवर जा, अॅप्स, वेबसाइट आणि प्लग इनसाठी दिसणा-या एडिट बटनवर क्लिक करा. यानंतर प्लॅट फॉर्म डिसेबल करा. 


फोन नंबर काढून टाका 

अकाउंटवर फोननंबर असल्यावर तुमचा हा नंबर कुणाजवळही सहज पोहोचू शकतो. तुमच्या नंबरचा कुणीही गैरवापर करु शकते. यामुळे तुम्ही प्रोफाइलवरुन आपला नंबर डिलीट करा. पुर्वी फेसबुकवर नंबर असणे गरजेचे होते. परंतु आता काही बदल करण्यात आले आहेत, यामुळे हे आवश्यक नाही. कान्टेक्ट फील्डवरुन आपला बंद पडलेला नंबरही काढून टाका. कारण नंतर हा नंबर एखाद्या कंपनीने दुस-यांना दिलेला असू शकतो. 


आपल्या प्रायव्हेट लाइफचा फोटो शेअर करु नका 
यूजर्स आपल्या आयुष्यातील लहान-मोठ्या अॅक्टव्हिटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. चुकूनही तुमचा डाटा लीक झाला तर यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. यामुळे प्रोफाइलवरुन तुमचे प्रायव्हेट फोटो डिलीट करा. 


लोकेशन शेअर करु नका 
लोक जेव्हा बाहेर जातात, तेव्हा पहिले फेसबुकवर आपल्या लोकेशनसोबत स्टेटस शेअर करतात. एयरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉलीडे डेस्टिनेशनवर गेल्यावर लोक लोकेशन शेअर करत असता. चुकूनही आपले लोकेशन शेअर करु नका. 
 

बातम्या आणखी आहेत...