आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुशार मैत्रिणीचा बदला घेण्यासाठी BF ला बनवले मोहरा, कोणालाही वाटले नव्हते ती असा कट रचेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पटियाला - कॉलेजच्या दोन मैत्रिणी. एक अभ्यात हुशार तर दुसरी सर्वसाधारण. बीए फायनल मध्ये एकिने जास्त गुण मिळवले तर कमी गुण घेतलेल्या मैत्रिणीने तिला धडा शिकवायचे ठरवले. स्वतःच्या BF लाच तिने मोहरा बनवले. त्याच्या आयडीवर बनावट सीम घेतले. आणि मैत्रिणीचे फेसबूक-इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. तिच्या खर्या अकाऊंटवरून फोटोज घेतले आणि ते एडिटिंग करून अॅडल्ट फोटो तयार केले आणि खोट्या अकाऊंटवर पोस्ट केले. पीडित तरुणी, बदला घेणारी मैत्रीण आणि तिचा BF हे सर्व कॉमन फ्रेंड होते त्यामुळे आपल्या आयडीचा गैरवापर होतोय हे BF लाही समजले नाही. तो स्वतःच पीडित तरुणीला न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्यात चकरा मारत राहिला. पण आयपी अॅड्रेस आणि नंबर हाती आल्यानंतर त्याचेच नाव समोर आले तर त्याला धक्काच बसला. नंतर तपासात सर्वकाही समोर आले. पोलिसांनी आरोपीसह तिच्या BF लाही सहआरोपी बनवले आहे. पीडितेच्या कुटुंबाची मात्र तरुणाच्या विरोधात तक्रार नाही. 


असे समजले तरुणीला 
आपली मैत्रीणच आपल्या विरोधात ईर्ष्येपोटी असा कट रचत असेल याची पीडित तरुणीला जाणीवच झाली नाही. एक दिवस तिला कोणीतरी सांगितले की, तिच्या नावाच्या फेसबूक-इन्स्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाले आहेत. तिला यावर विश्वासच बसला नाही. तिने पाहिले तेव्हा तिलाही धक्का बसला. 


विश्वासात न घेता वापरले आयडीप्रूफ 
आरोपी तरुणीने तिच्या BF चे आयडीप्रूफ त्याला विश्वासात न घेता किंवा न सांगता मिळवले होते. तिने काही दिवसांपूर्वी त्याला आधार कार्ड मागितले होते. त्याचाच वापर करून मोबाईलमध्ये सोशल मीडियाचे पेड तयार करण्यात आले होते. 


काळजी घ्या - पर्सनल फोटो शेअर करणे टाळा 
फेसबूकने सध्या त्यांच्याकडून काही पावले उचलली आहेत. त्यामुळे तुमचा डेटा कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला वापरता येणार नाही. तुम्ही फेसबूकवर लॉग इनकरून सेटिंग्जमध्ये जा अॅप्स, वेबसाईट आणि प्लग इनच्या खाली दिसणाऱ्या एडिट बटनवर क्लिक करा. त्यानंतर प्लॅटफॉर्म डिसेबल करा. 


फोन नंबर हटवा 
अकाउंटवर फोननंबर असल्याने तुमचा नंबर सहजपणे कोणालाही मिळू शकतो. त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रोफाइलवरून नंबर डिलिट करणेच योग्य ठरेल. पूर्वी फेसबूकवर नंबर गरजेचा होता. पण फेसबूकने केलेल्या बदलानंतर नंबर गरजेचा राहिलेला नाही. 


प्रायव्हेट लाइफचे फोटो कधीही शेअर करू नका 
यूजर्स प्रत्येक लहान सहान गोष्टींचे फोटो फेसबूक आणि इतर सोशल मीडियावर अपलोड करत असतात. पण तसे करू नका. कधी चुकूनही तुमचा डेटा लीक झाला तर हे फोटो अडचणीचे ठरू शकतात. प्रोफाइलवरून सर्व प्रायव्हेट फोटो काढून टाका. 


लोकेशन शेयर करू नका 
लोक नेहमी बाहेर जाताना सर्वात आधी लोकेशनसह स्टेटस शेअर करत असतात. एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन आणि हॉलिडे डेस्टीनेशनवर शक्यतो बहुतांश लोक तसे करतात. पण चुकूनही लोकेशन शेअर करू नका. 


एफबीद्वारे रजिस्ट्रेशन टाळा 
फेसबूकवर कोणत्याही प्रोडक्टचे पेज लाइक करू नका. तसेच फेसबूक अकाऊंटद्वारे इतर कोणत्याही कंपनी किंवा सर्व्हीसचे रजिस्ट्रेशन करू नका. 

बातम्या आणखी आहेत...