Home | National | Other State | Girl and her mother committed suicide by setting themselves on fire for loan notice in kerala

बँकेच्या कर्जाला कंटाळून मायलेकीने घेतले पेटवून, मुलीचा जागीच मृत्यू तर आईने उपचारादरम्यान सोडले प्राण

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 04:42 PM IST

बँकेने स्पष्ट केले की त्यांनी कर्जासाठी कुटुंबाला धमकावले किंवा कुठलाही दबाव आणला नाही

  • Girl and her mother committed suicide by setting themselves on fire for loan notice in kerala

    तिरूवनंतरपुरम- कर्जाची परतफेड आणि घर जप्तीच्या भीतीने मंगळवारी तिरूवनंतपुरमच्या नेयाटिनकारामध्ये राहणाऱ्या आई आणि मुलीने रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतले. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी वैष्णवीचा जागीच मृत्यू झाला तर 90 टक्के भाजलेली तिची आई लेखा यांना तिरूवनंतरपुरम मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी वैष्णवीचे वडील चंद्रन घरी नव्हते. चंद्रन यांनी आरोप केला आहे की, बँक अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी त्यांच्यावर दबाव आणला, त्यामुळेच दोघींनी टोकाचे पाऊल उचलले. पण कॅनरा बँकेने स्पष्ट केले की त्यांनी कर्जासाठी कुटुंबाला धमकावले किंवा कुठलाही दबाव आणला नाही.

    चंद्रन यांनी सांगितले की, त्यांनी 2005 मध्ये नेयाटिनकारा येथील कॅनेरा बँकेकडून पाच लाख रूपयांचे गृह कर्ज घेतले होते आणि यापुर्वीच त्यांनी आठ लाख रुपयांचा भरणासुद्धा केला होता.

    कर्जाची रक्कम भरताना चुक झाल्यामुळे सुमारे सहा लाख रूपये थकबाकी झाली त्यामुळे बँकेने मालमत्ता जप्त करण्याची धमकी दिली होती. थकबाकी भरण्यासाठी त्यांनी बँकेकडे काही दिवसांच्या मुदतीची मागणी केली पण बँकेने याची दखल घेतली नाही. याउलट बँकेचे अधिकारी सतत त्यांच्या पत्नीला फोन करून कर्जाची परतफेड करण्यास सांगत होते.

    या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी चंद्रन यांच्या घरासमोर रस्त्यावर चक्काजाम करून जबाबदार लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्यचे अर्थमंत्री थॉमस आयजॅक यांनी प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

Trending