आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका मैत्रिणीने दुसरीला फिरण्यासाठी बोलावले, मग तिनेच घडवला बलात्कार; पीडित म्हणाली, मला डॉक्टरांनी पाजली होती दारु

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या लखिसराय जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एक अल्पवयीन मुलगी जखमी आणि मद्यधुंद अवस्थेत सापडली. महिला पोलिसांनी तपास केला तेव्हा त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. तिच्यावर बलात्कार घडवून आणण्यात तिच्याच एका मैत्रिणीचा हात आहे. पीडितेने आपल्या मैत्रिणीवर लावलेल्या आरोपानुसार, तिची मैत्रिण तिला जत्रा दाखवण्याच्या बहाण्याने फिरण्यासाठी घेऊन गेली होती. परंतु, त्या ठिकाणी तिने तिच्यावर बलात्कार घडवला. पोलिस याबाबत सविस्तर तपास करत आहेत. 


काय म्हणाली पीडित तरुणी...
- पीडित मुलीचे वय फक्त 16 वर्षे आहे. तिनेच आपल्यावर घडलेल्या अत्याचाराची हकीगत पोलिसांसमोर मांडली आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, तिची एक मैत्रीण खुशी कुमारी उर्फ कुंती कुमारी शनिवारी संध्याकाळी तिच्या घरी आली होती. खुशीने त्या मुलीला आपल्यासोबत जत्रेत फिरण्यासाठी तयार केले. संध्याकाळी जाऊन रात्री 8.30 पर्यंत परत घरी येऊ असे मैत्रिणीने आश्वस्त केले होते. 
- ती खुशीसोबत आपल्या घरातून बाहेर पडली. परंतु, स्टाइल मार्केटजवळ थांबवून मी आत्ताच आले म्हणत निघून गेली. पीडित मुलगी अर्धा तास खुशीची वाट पाहत होती. यानंतर अचानक खुशी परतली आणि तिला डेरा केएसएस कॉलेज परिसरात एका रुममध्ये घेऊन गेली. 
- याच ठिकाणी एक 35-40 वर्षांचा माणूस आधीच थांबलेला होता. खुशी त्या माणसाला वारंवार डॉक्टर साहेब असे बोलत होती. पीडित मुलीने त्याला पहिल्यांदाच पाहिले होते. यानंतर खुशी तिच्यासाठी कोल्डड्रिंक घेऊन आली. ते पिताच पीडित मुलीला नशा चढली. त्या दोघांनी मिळून पीडितेला सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीत दारू पाजली होती. यानंतर नशेत असताना पीडितेवर बळजबरी करत बलात्कार केला. 
- आपल्यावर अत्याचार होत असताना पीडितेचे ओरडून हाल झाले होते. तिने मदतीसाठी खूप मोठ-मोठ्याने ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, यानंतरचे काहीच आठवत नाही. काही वेळानंतर थेट रुग्णालयात आपले डोळे उघडले. असे पीडितेने पोलिसांना लिहून दिले आहे. 

 

पोक्सो अॅक्ट अंतर्गत खटला दाखल
पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून आरोपींच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी खुशी आणि त्या माणसाला अटक केली. विनोद कुमार उर्फ गुड्डू असे त्या आरोपीचे नाव आहे. त्या दोघांनाही कोर्टात सादर करण्यात आले. कोर्टाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 


पीडितेच्या कपड्यांचाही तपास
पोलिसांना प्राथमिक तपासात पीडितेला दारू पाजण्यात आली असे निष्पन्न झाले. आता त्याचा खुलासा करण्यासाठी तिचे ब्लड सॅम्पल लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सोबतच घटनास्थळावर जाऊन तेथून काही सॅम्पल गोळा करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कपड्यांसह आरोपींच्या कपड्यांची सुद्धा फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...