आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Attempting Suicide On Facebook Live In Latur Maharashtra News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरमध्ये फेसबुक लाईव्हवर गुडनाईट लिक्विड प्राशन करून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणी पॅंथर सेनेची पदाधिकारी...

लातूर- फेसबुक लाईव्हवर गुडनाईटचे लिक्विड प्राशन करून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरमधील औसा रोड परिसरात ही घटना घडली आहे. तरुणीला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.

 

मिळालेली माहिती अशी की, तरुणीने रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास फेसबुक लाईव्हवर गुडनाईट लिक्विड प्राशन आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. तरुणीचा हा प्रकार सायबर पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ तरुणीचे घर गाठले. मात्र, तोपर्यंत तरुणीने लिक्विड प्राशन केले होते. पोलिसांनी तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

 

तरुणी पॅंथर सेनेची पदाधिकारी...

संबंधित तरुणी पँथर सेनेची पदाधिकारी होती. तिने अलिकडे राजीनामा दिला होता. काही लोक त्रास देत होते. यामुळे चिडून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. पोलिसांनी फेसबुकवरुन संबंधित लिंक हटवली आहे. सध्या तरुणीची प्रकृती स्थीर असून पोलिस पुढील तपास करत आहेत.