आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागदा (एमपी) - मतदानाच्या उत्साहाचे एक उदाहरण नागदा जिल्ह्याच्या दीपिका सोनीचेही आहे. जागरूक दीपिकाने आपल्या होणाऱ्या नवऱ्यासमोर अट ठेवली की, 28 नोव्हेंबर रोजी मतदानासाठी ते तिला माहेरी जाण्याची परवानगी देतील, तरच लग्न करेल. दीपिकाची ही अट पती आणि सासरच्या मंडळींनी मान्य केली, तेव्हा कुठे दीपिकाच्या घरी लग्नविधींना सुरुवात झाली. सोमवारी दीपिकाचे लग्न होत आहे. 20 वर्षीय दीपिकाचे विधानसभेसाठी हे पहिलेच मतदान असेल.
मतदानासाठी राजस्थानातून येणार नवरी
दीपिकाचे लग्न राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील नितेशशी ठरले. या वर्षी 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत गुरू तारा अस्त असल्याने मांगलिक कार्यांसाठी शुभ मुहूर्त नसल्याने विवाहासाठी 19 नोव्हेंबर कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर लग्न ठरले. निवडणुकीचे वातावरणही चांगलेच तापलेले आहे. यामुळे दीपिकाचीही मतदानाची इच्छा आहे. दीपिकाने नीतेशसमोर अट ठेवली की, 28 नोव्हेंबर रोजी तिला माहेरी जाऊ दिले, तरच ठरलेल्या दिवशी लग्न पार पडेल. नितेशनेही दीपिकाची अट मान्य करून विवाहानंतर मतदानासाठी माहेरी पाठवण्याची परवानगी दिली. सोमवारी मंदसौरमध्ये होणाऱ्या समाज संमेलनात दोघांचे लग्न होत आहे.
आईवडिलांकडून मिळाली प्रेरणा, 18 ची होताच बनवले होते मतदान कार्ड
दीपिकाने सांगितले- मतदानासाठी तिला वडील ओमप्रकाश सोनी आणि आई शारदा यांच्याकडून प्रेरणा मिळाली. लहानपणापासूनच आईवडिलांना मतदानाचे कर्तव्य पार पाडताना तिने पाहिले आहे. यामुळे 18 वर्षे वयाची होताच तिने मतदान कार्ड बनवून घेतले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.