Home | Khabrein Jara Hat Ke | Girl Big and Beautiful Eyes Due To Rare Genetic disorder

मोठे मोठे डोळे घेऊन जन्माला आली मुलगी, तिला पाहून अनोळखी लोकही करायचे कौतुक, सर्वकाही माहित असूनही आईला म्हणावे लागायचे - धन्यवाद

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 03:07 PM IST

मुलीच्या डोळ्यांच्या सुंदरतेमागे लपले आहे एक वाईट कारण... 

 • Girl Big and Beautiful Eyes Due To Rare Genetic disorder

  मिन्नेसोटा : अमेरिकामध्ये राहणाऱ्या दोन वर्षांच्या एका मुलीचे डोळे खूप सुंदर आहेत, ज्याचे कौतुक प्रत्येकजण करतो. पण तिच्या या सुंदरतेमागचे कारण फार वाईट आहे. ती मुलगी डोळ्यांच्या एका फार कठीण आजाराचा सामना करत आहे. ज्यामुळे तिचे डोळे खूप मोठे दिसतात. जन्माच्या आठवड्याभरानंतरच तपासणीदरम्यान तिला हा आजार असल्याचे कळाले होते. हा आजार 2 लाख मुलांमध्ये एकाला होतो आणि यामुळे तसे मूल आंधळे होण्याचीही शक्यता असते.

  जन्मापासूनच होते आहे डोळ्यांचे कौतुक
  - ही कहाणी मिन्नेसोटामध्ये राहणाऱ्या मेरोन आणि करीना मार्टिनेज यांच्या दोन वर्षांची मुलगी मेहलानीची आहे, जी एका रेयर सिन्ड्रोम एक्सेनफेल्ड रीगरचा सामना करत आहे. त्यामुळे तिचे डोळे सामान्य लोकांपेक्षा जास्त मोठे दिसतात.
  - मुलीच्या अणे सांगितले, जेव्हा मेहलानीचा जन्म झाला तेव्हा मी 18 वर्षांची होते आणि मला कोणतीही मेडिकल प्रोब्लेमही नव्हता. सुमारे 10 तास लेबर पेनझाल्यानंतर माझी नॉर्मल डिलिवरी झाली एका सुदृढ मुलीने जन्म घेतला. मुलीचे डोळे थोडे मोठे होते आणि सर्वच त्याचे कौतुक करायचे. ती खूप छान वाताची त्यामुळे माही खूप खुश होतो.
  - हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करण्यापूर्वी तिच्या पूर्ण तपासण्या करण्यात आल्या आणि त्यानंतर डॉक्टरने कपल ती दुःखद गोष्ट सांगितली. डॉक्टरने सांगितले कि मुलीला एक असामान्य आजार झाला आहे.
  - डॉक्टरने सांगितले की, गर्भात मुलीचे डोळे पूर्णपणे विकसित होऊ शकले नाही आणि ते वाईट अवस्थेत आहेत. डॉक्टरनुसार, या आजारामुळे मुलीला इतर व्याधींचाही सामना करावा लागतो आहे. यामध्ये हृदयाच्या समस्या आणि ग्लुकोमादेखील सामील आहे.

  फॅमिलीने आजाराचे नावदेखील ऐकले नव्हते...
  - मुलीला जो आजार आहे त्यामुळे तिचे डोळे मोठे आणि संवेदनशील आहेत. ज्यामुळे ती उन्हामध्ये सन ग्लासेस घातल्याविना जाऊ शकत नाही.
  - वर्षभरापूर्वी तिच्या डोळ्यांमध्ये ग्लुकोमा असल्याचेही कळाले होते. ज्यामुळे तिच्या डोळ्यांवर पडणारा दबावही वाढला आहे. त्यामुळे आता तिच्या डोळ्यांची दृष्टी जाण्याचीही शक्यता आहे.
  - मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, आम्ही कधीही एक्सेनफेल्ड रीगर या आजाराबद्दल ऐकले नव्हते. आम्हाला केवळ ग्लुकोमाबद्दल माहित होते, जो वयस्कर लोकांना होणारा आजार आहे.
  - करीनानुसार, 'प्रत्येकवेळी जेव्हा अनोळखी लोक तिच्या डोळ्यांचे कौतुक करतात. तेव्हा मला वाटते की, मी तिच्या या जराबद्दल सांगितले पाहिजे की, नको. मग मी हसून त्यांना केवळ धन्यवाद म्हणते.

Trending