आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी सात वाजता धार्मिक स्थळावर जोरात ओरडत होते माकड, शंका आल्याने लोकांनी वर जाऊन पाहिले तर थरकाप उडाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाझियाबाद - गाझियाबादमध्ये रविवारी सकाळी एका धार्मिक स्थळाच्या छतावर 7 वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. दुसऱ्या वर्गात शिकणारी ही चिमुरडी शनिवार दुपारी बेपत्ता झाली होती. तिचा मृतदेह पोत्याखाली लपवलेला होता. या चिमुरडीच्या गळ्यावर जखमांचे व्रण आढळले आहेत. तिचा चेहराही चिरडण्यात आला आहे. या प्रकरणात चिमुरडीच्या नातेवाईकांनी शेजारी असलेल्या बसपा कार्यकर्त्याच्या आणि इतरांच्या विरोधात अपहरण करून हत्या केल्याची तक्रार दाखल केली आहे. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस सर्व दिशांनी तपास करत आहेत. 


शनिवारी दुपारी दुकानावर गेली होती, नंतर परतलीच नाही चिमुरडी
पोलिसांनी सांगितले की, मृत चिमुरडीचे वडील कॉलनीमध्येच एक पब्लिक स्कूल चालवतात. कुटुंबामध्ये मुलीचे आई वडील आणि एक बहीण तसेच 2 भाऊ आहेत. कुटुंबातील लोकांनी सांगितले की, शनिवारी दुपारी सुमारे 12:30 वाजता मुलगीएक दुकानातून खाऊ आणायला गेली होती. दुपारी 2 वाजेपर्यंत मुलगी परतली नाही तेव्हा तिचा शोध सुरू झाला. घराघरात तपास सुरू झाला. तरीही काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. 


धार्मिक स्थळावर ओरडू लागली माकडे.. 
लोकांनी सांगितले की, रविवारी सकाळी 7 वाजता एका धार्मिक स्थळाच्या वर माकडे जोराज ओरडत होती. ते पाहून लोकांना संशय आला. लोक छतावर पोहोचले. तेव्हा एका कोपऱ्यात पोत्याखाली मुलीचे पाय बसून सर्वांचा थरकाप उडाला. पोते हटवले तर मृतदेहाचती अवस्था पाहून सर्वांना रडू कोसळले. अत्यंत निर्घृणपणे चिमुरडीची हत्या करण्यात आली होती. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमा आणि चेहरा चिरडण्यात आला होता. 


नातेवाईकांच्या तक्रारीवरून एजाजसह नौशाद, इंतजार आणि अफजाल विरोधात अपहरण, हत्या आणि अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोस्ट मॉर्टर्मरिपोर्टमध्ये नेमके काय ते स्पष्ट होईल असेही पोलिस म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...