आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Love मॅरेजनंतर 6 महिन्यांनी सासरची मंडळी म्हणाली- गर्भ पाडून टाक, आईवडिलांकडे गेली तर बसला आणखी एक धक्का, मग पोलिसांनी तर हद्दच केली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोतिहारी (बिहार) - आंतरजातीय विवाह केल्याची शिक्षा एका किशोरवयीन मुलीला अशी मिळाली की, सासरच्या मंडळींनी तिला गर्भ पाडण्याचा सल्ला दिला. पळून पोलिस स्टेशनमध्ये गेली तर तेथे पोलिसांनी माणुसकी विसरून लज्जास्पद काम करत हद्दच पार केली. पोलिस तिला 900 रुपये देऊन म्हणाले- येथून चालती हो! तिथून माहेरात पोहोचली तर गावकऱ्यांनी जखमेवर आणखी मिठ चोळले. आईवडील म्हणाले- तुझे तोंडही दाखवू नकोस. आता निराधार बनून ती दारोदार भटकत आहे. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा प्रेमजालात अडकवणारा तिचा पती लग्नाच्या 6 महिन्यांनीच तिला सोडून फरार झाला. सहन कुठवर करणार, सासरपासून ते माहेरपर्यंत तिचे दु:ख काही कमी झालेच नाही.

 

एका तुघलकी फर्मानामुळे तरुणीला सहन करावे लागतेय दु:ख

आता तिला आपल्या माणसांजवळही राहू दिले जात नाहीये. समाजातील काही ठेकेदार अजूनही प्रेमविवाहाला मान्यता देत नाहीयेत. त्यांचे तुघलकी फर्मान अजूनही जारी आहे. याचा दंश एका विवाहित तरुणीला बसला आहे. जीवित्वाच्या रक्षणासाठी पीडितेने महिला हेल्पलाइनचा आधार घेतला. तेथून पीडितेच्या वडिलांना बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ते ऐकले नाहीत अन् प्रकरण पोलिसांत गेले. पीडिता हरसिद्धी परिसरातील एका गावातील रहिवासी आहे. तिने आता पोलिसांना न्याय मिळवून देण्याची विनवणी केली आहे.

 

प्रेमजाळात अडकवले, मग मंदिरात केले लग्न
पीडित मुलीने सांगितले की, तिच्या गावातील शाळेत मधुबनी जिल्ह्याचा एक शिक्षक राहतो. त्याचा पुतण्या अभिषेकही त्यांच्यासोबत राहायचा. शाळेता जाता-येता दोघांमध्ये प्रेम जुळले. यानंतर अभिषेक तिला आपल्यासोबत मधुबनीला घेऊन गेला. तेथे एका मंदिरात दोघांनी लग्न केले. लग्नानंतर अभिषेक तिला आपल्या बहिणीच्या घरी नेऊन 3 महिने सोबत राहिला. नंतर जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा तिला सोडून फरार झाला. यानंतर अभिषेकच्या बहिणीने तिला घरातून हाकलून लावले. यावर ती पतीच्या म्हणजेच अभिषेकच्या घरी गेली. तेथे तिच्या सासरच्या मंडळींनी तिला गर्भ पाडण्यास सांगितले, ती ऐकली नाही म्हणून घरातून पिटाळून लावले.


पोलिसांनी पीडितेच्या हातावर ठेवले 900 रुपये, म्हणाले- जा तुझ्या घरी!

पीडितेने सांगितले की, तिला अभिषेकच्या घरातून हाकलल्यानंतर ती तेथील पोलिस स्टेशनमध्ये गेली. तेथे तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तेथील एका पोलिसाने तिच्या हातावर 900 रुपये देऊन म्हटले, तू तुझ्या घरी जा! यानंतर तिला मधुबनी जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये गेली. तेथून तिची रवानगी महिला हेल्पलाइनला झाली. यानंतर तिला 8 दिवस तेथील बालिका गृहात ठेवण्यात आले. मग तिच्या वडिलांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु माहेरातही तिच्या वडिलांच्या शेजारचे काही जण येऊन तिला घरात येऊन धमकी देतऊ लागले. म्हणायचे- हिला घरातून हाकला, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा.

 

पीडितेची झाली वैद्यकीय तपासणी
आता या प्रकरणात पीडितेच्या जबाबावर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. त्यात पीडितेने आपला पती अभिषेक, सासरा, चुलत सासरा, नणंदेसहित अर्ध डझन लोकांवर आरोप ठेवले आहेत. स्टेशन इंचार्ज कृष्णदेव खटाईत म्हणाले की, पीडितेच्या जबाबाच्या आधारे पती अभिषेकसहित अर्ध डझन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पीडितेची मे मेडिकल टेस्टही करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून या गंभीर प्रकरणात योग्य ती कारवाई करू. 

 

 

बातम्या आणखी आहेत...