आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या Murder ने खचली, प्रेमात पडली; 6 वर्षे सोबत राहणाऱ्या प्रियकराने दिला दगा, तरुणीची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया - बिहारच्या ग्रामीण भागात एका 23 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती गेल्या 6 वर्षांपासून आपल्या प्रियकरासोबत राहत होती. ही घटना गया जिल्ह्यातील एका गावात घडली. तिचा प्रियकर त्याच गावातील रहिवासी होता. गतवर्षी या दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मंदिरात विवाह केला होता. परंतु, या लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात युवकाने त्याच्या प्रेयसीला बहिणीच्या घरी पाठवले आणि स्वतः दुसरा विवाह केला. या प्रकरणात पीडित तरुणीने पोलिसांत लैंगिक शोषणाचे आरोप सुद्धा दाखल केले होते. 

 

आईचा मर्डर, प्रियकराकडून दगा मिळाल्याने डिप्रेशनमध्ये होती...
तरुणीचे मामांनी सांगितल्याप्रमाणे, पीडित तरुणीच्या आईचा 10 वर्षांपूर्वी खून झाला होता. तिचा मृतदेह घरापासून काही अंतरावर सापडला होता. नेहमीच उदासीन राहणाऱ्या या तरुणीच्या आयुष्यात सतीश नवी उमेद घेऊन आला होता. तिने सतीशसोबत खूप स्वप्न पाहिले होते. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मंदिरात प्रेम विवाह केला होता. परंतु, त्यानेच आपल्याला दगा दिल्याचे पाहता ती पूर्णपणे आतून खचली होती. सोबतच, पोलिसांत तक्रार करूनही सतीशवर कारवाई होत नसल्याने ती डिप्रेशनमध्ये गेली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून ती पोलिसांकडे चक्रा लावत कारवाईची मागणी करत होती. पीडित तरुणीने तक्रार केली तेव्हा सतीशच्या नातेवाइकांनी वेळीच त्याचा जामीन मंजूर करून घेतला. 


आरोपी सतीश कुटुंबियांसह फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनाच्या घरात बुधवारी सकाळी शेजाऱ्यांनी तीव्र दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील पंख्याला मीनाचा मृतदेह लटकला होता. तिच्या फोनची बॅट्री सुद्धा संपलेली होती. शेजाऱ्यांनी तिला सोमवारपासून पाहिले नव्हते. त्यामुळे, तिने 4 दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून सविस्तर तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...