आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधी मुलीने केली आत्महत्या, हातावर लिहिले होते मृत्यूचे कारण; म्हणाली- \'मी मेल्यावरही त्याला सोडू नका\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरजपूर (छत्तीसगड) - जिल्ह्यातील भटगाव येथे गुरूवारी एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थिनीने आपल्या प्रियकराला तिच्या मृत्युप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्याबाबत तिने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर सुसाइड नोट लिहिली आहे. दोघेही लवकरच लग्न करणार होते. 

 

मोबाइलवर चॅटिंगदरम्यान झाले भांडण
> भटगाव येथे राहणारे रागिणी सिंग आणि अक्षय सिंग यांचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच समाजाचे असल्यामुळे त्यांच्या घरचे दोघांच्या लग्नासाठी तयार होते. दरम्यान गुरुवारी दोघेही मोबाइलवर चॅटिंग करत असताना त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणामुळे भांडण झाले होते. 

 

मुलाने लग्नास नकार दिल्यामुळे मुलीने घेतली फाशी
> त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यामुळे अक्षयने लग्न करण्यास नकार दिला. यामुळे रागिणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब तिच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी रागिणीला रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. 

 

आत्महत्या करण्यापूर्वी हातावर लिहीली सुसाइड नोट
> आत्महत्या करण्यापूर्वी रागिणीने हातावर सुसाइड नोट लिहीली होती. या नोटमध्ये सांगितले आहे की, तिच्या आत्महत्येला अक्षय जबाबदार आहे. तिच्या मृत्यूनंतर अक्षयला कुठल्याही परिस्थितीत सोडू नका. पोलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला असून पुढील कारवाई करत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...