आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइडः 25 वर्षीय नर्सने आधी बनवला मृत्यूच्या तयारीचा व्हिडिओ, शेवटी ज्याच्यामुळे जीव देत होती, त्याच्याबद्दल म्हणाली फक्त 3 शब्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलासपूर - ज्याच्यासेाबत आयुष्यभर जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतल्या, त्याने दुसरीशीच साखरपुडा उरकल्याने प्रेयसीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तिने एक व्हिडिओही आपल्या छोट्या बहिणीचा मैत्रिणीला पाठवला आहे. मृत नर्सचे प्रेमप्रकरण सुरू होते, दोन दिवसांपूर्वीच तिचा प्रियकराशी वाद झाला होता. मित्रांनी समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. ही घटना सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या यादव मोहल्ल्याति रविवारी सकाळी 7:30 ते 8:00 वाजेदरम्यानची आहे. 

 

10 वर्षांपासून सुरू होते अफेयर...
25 वर्षीय नीलम यादव आपल्या छोट्या बहिणीसोबत राहत होती. ती एका खासगी नर्सिंग होममध्ये नर्सचे काम करत होती. रविवारी सकाळी नीलमने छोट्या बहिणीचा मित्र ललित बघेलशी बातचीत केली आणि याच्या काही वेळानंतर गळफास तयार करून पंख्याला लटकली. नीलमने आपल्या आत्महत्येआधी एक व्हिडिओही तयार करून आपल्या बहिणीचा मित्र ललितला पाठवला आहे. पोलिसांच्या मते, नीलमचे अमित पटेल नावाच्या तरुणाशी गत 10 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. अमितने काही महिन्यांपूर्वी दुसऱ्याच तरुणीशी साखरपुडा उरकला होता.

 

2 दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर झाले कडाक्याचे भांडण
अमितने दुसऱ्या तरुणीशी साखरपुडा केल्यानंतर नीलम तणावात होती. तिला विश्वास बसत नव्हता की, ज्याच्याशी आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या, तो असा अचानक बदलून जाईल. यावरूनच दोघांचे दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनवर कडाक्याचे भांडणही झाले होते. त्यानंतर हा वाद नीलम जेथे किरायाने राहते तिथपर्यंत पोहोचला. येथे समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु यश आले नाही. 

 

काय आहे व्हिडिओत?
नीलम यादवने आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडिओ तयार केला आहे, त्यात ती ओढणीच्या साहाय्याने गळफास बनवून त्याला लटकताना दिसत आहे. यानंतर फास गळ्यात टाकतानाचेही दृश्य या व्हिडिओत आहे. या व्हिडिओत नीलमने फक्त 3 शब्द म्हटले आहेत - अमितला सोडू  नका.

 

काय म्हणतात पोलिस?
नीलम ज्याच्यावर प्रेम करायची, त्याचा काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला होता, ज्यामुळे ती तणावात होती. यावरून दोघांचे भांडणही झाले. व्हिडिओत ती फक्त एवढेच म्हणत आहे की, अमितला सोडू नका. पोलिस अधिक चौकशी करत आहेत. 
- जगदीश मिश्रा, टीआय, सिविल लाइन

 

 

बातम्या आणखी आहेत...