आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉलच्या 5 व्या मजल्यावरून उडी घेत तरुणीची आत्महत्या, अभियांत्रिकी, एमबीएमध्ये अपयशाचा चिठ्ठीत उल्लेख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- शहरातील गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या “नेक्स्ट लेव्हल’ मॉलच्या पाचव्या मजल्यावरील हॉटेलमधून उडी घेऊन एका २७ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ५) सकाळी घडली. मृत तरुणीच्या बॅगमधून पोलिसांना चिठ्ठी मिळाली असून गेल्या वर्षभरापासून सातत्याने आत्महत्येचे विचार मनात येत होते, त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे चिठ्ठीत तरुणीने नमूद केले आहे.
 
रूपाली सुरेशराव बुधाने (२७, रा. शिराळा, ता. जि. अमरावती) असे मृत तरुणीचे नाव आहे. गर्ल्स हायस्कूल चौकात ‘नेक्स्ट लेव्हल’ नावाचा मॉल आहे. याच मॉलच्या चौथ्या व पाचव्या माळ्यावर “अप अँड अबाऊ’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये टेरेसवर ग्राहकांना बसण्याची सुविधा आहे.  शनिवारी सकाळी रूपाली लिफ्टमध्ये हॉटेलमध्ये गेली. त्यानंतर लिफ्टने वरून पुन्हा खाली व खालून पुन्हा वर गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या वेळी मात्र हॉटेलमध्ये ती जाताना कोणालाही दिसली नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सकाळची वेळ असल्यामुळे हॉटेलमध्ये इतर ग्राहक नव्हते.  रूपालीने पाचव्या माळ्यावरून खाली उडी घेतली. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रूपाली रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडून असताना पोलिस कर्मचारी अविनाश आत्राम हे जिमसाठी याच ठिकाणी आले होते. तसेच एएसआय पाली हेसुद्धा ड्यूटीवर जाण्यासाठी त्या मार्गाने जात होते. या दोघांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने रूपालीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. 
 

नागरिकांनी  दिले आवा
याच हॉटेलच्या समोरच्या बाजूला दयासागर रुग्णालय आहे, रुपाली उडी घेत होती, त्यावेळी या रुग्णालयाच्या टेरेसवर काही व्यक्ती होते. त्यांना रुपाली उडी घेत असल्याचे लक्षात अाल्यावर त्यांनी थांब, थांब, उडी घेऊ नको, असे आवाज दिले. मात्र तिने दुर्लेक्ष करून उडी घेतली.
 

दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये  म्हणून..
रूपालीच्या बॅगमध्ये चिठ्ठी आढळली आहे. ‘मी अभियांत्रिकीलासुद्धा नापास झाले होते. त्यानंतर एमबीएमध्येही अपयश आले. त्यामुळे मी सातत्याने तणावाखाली वावरत आहे. मागील वर्षभरापासून मी आत्महत्येचा विचार करत आहे. या विचारातून मुक्त व्हावे म्हणून मी अमरावतीत वाचनालयात येते. मात्र, तरीही आत्महत्येचा विचार माझ्या मनातून जात नव्हता. आता आई, बाबा माझे लग्न करण्यासाठी मुलांचा शोध घेत आहेत. मी आत्महत्या करणारच असल्यामुळे ज्या घरात लग्न करून जाणार त्या घरातील व्यक्तींचे आयुष्य खराब होईल. मला नेहमी आई, बाबा, भाऊ, ताई यांनी सातत्याने पाठबळ दिले आहे. माझ्या या निर्णयामुळे सर्वांना प्रचंड धक्का बसेल आणि त्रासही होणार आहे, त्यामुळे मला माफ करावे,’ असे चिठ्ठीत नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...