आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी पास होण्याच्या आनंदात वडिलांनी घरी आणले पेढे, पण अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्याने मुलीने घेतला गळफास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा : स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थी टक्केवारीच्या मागे धावत आहेत. टक्केवारीच्या मागे धावताना ते आपल्या जिवाचाही विचार करत नाहीत. त्यात अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले तर टोकाची पावले उचलतात. वर्ध्यातील अडेगाव येथे असाच काहीसा प्रकार घडला आहे. बारावीच्या परिक्षेत आपल्या मुलीने मिळवलेल्या गुणांबाबत पालक खुश होते. मनासारखे गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने आपले जीवन संपवले. पूजा विजय भिसे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 

 

राहत्या घरी गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

पूजा जनता वरिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी होती. बारावीच्या निकालाची तिलाही उत्सुकता होती. तिने ऑनलाईन निकाला पाहिला. तिला बारावीत 55 टक्के गुण मिळाले. कोणतीही शिकवणी न लावता फक्त महाविद्यालय आणि स्वतःच्या कष्टाने हे यश संपादन केले. मुलीच्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी वडील विजय भिसे घरी पेढे घेऊन आले. पण सायंकाळच्या सुमारास पुजाने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली आणि पुजा पास झाल्याचा आनंद दुःखात बदलला. पुजाच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.