आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहलीसाठी संसदेत गेली होती 12 वर्षांची मुलगी, तिथे असे काही पाहिले की थेट पंतप्रधानांना केली तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा - ऑस्ट्रेलियामध्ये 12 वर्षांची एक मुलगी संसदेचे कामकाज पाहण्यासाठी गेली होती. पण देशाच्या संसदेचे कामकाज पाहून तिची अत्यंत निराशा झाली. तिला एवढे वाईट वाटले की तिने पंतप्रधानांना एक पत्रच लिहिले. त्यात तिने नेत्यांचे वर्तन आणि त्यांच्या भाषेबाबत तक्रार केली. तसेच त्यांना सुधारणा करण्याचा सल्लाही दिला. पत्राच्या शेवटी नाव लिहित स्वतःची ओळख तिने देशाचे भविष्य अशी लिहिली. सध्या जगभरात हे पत्र व्हायरल होत आहे. 


- ही स्टोरी ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा शहरातील 12 वर्षीय मुलगी एला एजरगॅलिसची आहे. ती. 28 नोव्हेंबरला शाळेकडून संसदेचे कामकाज पाहायला गेली होती. 
- एला आणि इतर मुलींना 'गर्ल्स टेकओव्हर पार्लियामेंट' प्रोग्राम अंतर्गत ऑस्ट्रेलियन पार्लियामेंटमध्ये झिरो आवर पाहण्याची संधी मिळाली होती. एलासह इतर मुली राजकारणाबाबत समजून घ्यायला उत्सुक होत्या. पण त्याठिकाणचे चित्र पाहून त्यांच्या हाती निराशाच आले.  
- परत आल्यानंतर एलाने देशाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना एख भावनिक पत्र लिहिले. त्यात तिने नेत्यांचे वर्तन, त्यांची भाषा आणि ऐकूण न घेण्याची सवय याबाबत तक्रार करत यात सुधारणा करण्याचा सल्ला दिला. 
- मुलगी म्हणाली की, भेटीदरम्यान संसद सदस्यांचे वर्तन पाहून तिला लाज वाटली आणि प्रचंड निराशा झाली. यादरम्यान सहा सदस्यांना संसदेबाहेर काढले. ते तरुणांसमोर अत्यंत घाणेरडा आदर्श ठेवत होते. 
- पंतप्रधानांना मुलगी म्हणाली की, या सर्वांनी एकमेकांचा आदर करत सर्वांचे म्हणणे ऐकूण घ्यायला हवे. ओरडण्याऐवजी जर ते आपली मते शेअर करतील तर देशाचे भले होईल, अन्यथा ओरडून काहीही मिळणार नाही. 


मुलगी म्हणाली, त्यांना आमच्या शाळेत पाठवा 
- एलाने तिच्याकडून सल्ला देत म्हटले की, खासदारांचे वर्तन पाहून असे वाटते की, मुलांना संसदेत नेण्याऐवजी या संसद सदस्यांना आमच्या शाळेत येऊन मुले विद्यार्थी संसद कशी चालवतात ते दाखवायला हवे. 
- मुलीने लिहिले, आम्ही सर्व एकमेकांचा आदर करतो. कोणी बोलत असेल तर त्याचे ऐकतो. एकमेकांचे विचार ऐकूण सल्ले देतो. शाळेची मूल्ये टिकतील याची काळजी घेतो. 
- शेवटी तिने पंतप्रधानांना लिहिले, तुमच्याकडे बदल करण्याची शक्ती आहे. त्यामुळे संसदेते वातावरण चांगले व्हावे आणि नेत्यांचे वर्तन सुधारावे यासाठी पावले उचलावीत. 
- पत्राच्या शेवटी तिने नाव लिहित तिची ओळख, ऑस्ट्रेलियाचे भवितव्य अशी लिहिली. 

बातम्या आणखी आहेत...