आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षाचा यू-ट्यूबर दानिश जहांच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ झाला व्हायरल, कार चालवताना ऐकत होता गाणे, लिपसिंकही करत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 21 वर्षाचा यू-ट्यूबर आणि ब्लॉगर दानिश जहांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ त्याच्या मृत्यूपूर्वी व्हिडीओ आहे असे सांगितले जात आहे. यामध्ये दानिश कार चालवत चालवत कोणतेतरी गाणे ऐकत आहे आणि त्यावर लिप्सिंकही करत आहे. monika6600 नावाने ट्विटर हैंडल वरून शेयर केलेल्या या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, "जर शक्य असेल तर कृपया कार चालवताना फोनचा वापर करू नका आणि व्हिडीओ बनवू नका. 2 मिनिटाची मज्जा आयुष्यापेक्षा मोठी नाही." गुरुवारी एका लग्नातून मुंबईत परतताना दानिशच्या कारचा अक्सीडेंट झाला आणि यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. 

 

Last video of #DanishZehen
RIP💔#AceOfSpace
If possible toh plz avoide phone aur making video while driving
2 min ka fun is more important than life 🙌🙏💔 pic.twitter.com/1XySiOUqWF

— vg ki khoj main|| we support vikas (@Monika6600) December 20, 2018

दानिशच्या मृत्यूनंतर धाय मोकलून रडली मैत्रीण...
- दानिशच्या एका मैत्रिणीचाही व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती रडत रडत सांगत होती कि दानिशच्या मृत्यूच्या दोन दिवस अगोदर त्यांचे बोलणे झाले होते आणि त्यावेळी दानिश तीला म्हणाला होता की, "जर मी मेलो तर तू रडशील का." या मुलीचे नाव अर्शिफा खान असे सांगितले जात आहे. 

 

सारा अली खाननेही दिली श्रद्धांजली.. 
दानिश जहांच्या मृत्यूची बातमी ऐकून अभिनेत्री सारा अली खानलाही धक्का बसला. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप शेयर करून लिहिले आहे, "देव तुझ्या आत्म्याला शांती देव दानिश." साराने यासोबत एक व्हिडीओ क्लीपदेखील शेअर केली. ज्यामध्ये दानिश तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होता. ही व्हिडीओ क्लिप दानिशचा शेवटचा रियलिटी शो 'Ace of Space' ची आहे. विकास गुप्ताच्या या शोमध्ये दानिश कंटेस्टेंट होता. तर सारा तेथे गेस्ट म्हणून गेली होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

R.I.P Danish Zehen ❤️🖤❤️🖤❤️🖤

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on Dec 20, 2018 at 10:27am PST

बातम्या आणखी आहेत...