आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दंतेवाडा(छत्तीसगढ)- जिल्हातील समेली गावात एका युवतीया मृतदेह रविवारी झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. ती ज्या झाडावर लटकली ते झाज घरापासून फक्त 50 मीटर अंतरावर आहे. युवतीने सप्टेंबरमध्ये सैन्यातील जवानांवर बलात्काराचा आरोप लावला होता. युवतीच्या आत्महत्त्येची माहिती मिळताच एसपी डॉ. अभिषेक पल्लव समेली गावात पोहचले, सोबत सुरक्ष बलाची टीमदेखील होती. पण युवतीच्या घरच्यांनी तोपर्यंत मृतदेहाला झाडावरून खाली उतरवले होते.
एका बाजुला पोलिस याला आत्महत्या मानत आहेत, तर दुसरीकडे हत्त्या करून झाडावर लटकवल्याचा संशय व्यक्त करत आहेत. युवतीच्या घरच्यांनी आरोप लावला आहे की, समाजसेवक सारखे येऊन तिची चौकशी करायचे, त्यामुळे तिला खुप वैताग आला होता. तिला बदनाम होण्याची चिंता होती त्यामुळे ती सारखी म्हणायची मी आत्महत्या करणार आहे. सप्टेंबरमध्ये समेलीच्या नाल्याजवळ ती बेशुद्ध अवस्थेत गावातील लोकांना मिळाली होती, सैन्यातील जवानांनी तिच्याबर बलात्कार केल्याचा संशय गावातील लोकांना होता.
चौकशीत युवतीने 2 वेगवेगळी साक्ष दिली
त्या वेळसची संवेदनशील परिस्थीती पाहून 5 डॉक्टर्सनी 2 वेळा तिची मेडिकल तपासणी केली, पण बलात्कार झाल्याचे उघड नाही झाले, बस तिच्या शरिरात हीमोग्लोबीनची कमतरता आढळली. चौकशीदरम्यान तिेने 2 वेगवेगळी साक्ष दिली. रूग्णालयाच्या ज्या वार्डमध्ये तिला ठेवले होते, तेथे पोलिसांनी काही छुपे कॅमेरे लावले आणि त्यात काही लोक तिच्यावर दबाव टाकत असल्याचे आढळून आले. त्यानंतर 2 वेळा तिने रूग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणाला बाकी काही नसून सुरक्षा बलाला बदनाम करण्याचा कट असल्याचे सांगितले आहे.
चौकशी करायचे समाजसेवक आणि पोलिस
''माझ्या बहिणीवर बलात्कार झाला का नाही ते मला माहीत नाही, मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्कार नसला झाल्याचे सांगण्यात आले आहे. रूग्णालयातून ती घरी आल्यावर दिल्ली-रायपुर वरून समाजसेवी 2-3 वेळेस आले होते, सारखी चौकशी करून तिला परेशान करायचे. त्यासोबतच पोलिसांनी तिला दोन वेळा ठाण्यात बोलवले होते. ती नेहमी म्हणायची मी बदनाम झाली आहे. तिने दोन वेगवेगळी साक्ष दिली होती, त्यावरून घरी आल्यावर तिचा आई-वडिलांसोबत वाद झाला होता. ती खुप त्रस्त होती आणि एकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.'' असे तिच्या भावाने सांगितले.
आम्ही युवतीला नाही तर तिच्या आई-वडिलांना बोलवले होते
पहिले तर हा आत्महत्येचे प्रकरण दिसत आहे, किंवा असेही असू शकते की, हत्या करून तिला झाडाला लटकवण्यात आले आहे. पीएम रिपोर्टनंतरच सगळे स्पष्ट होईल. सुरूवातील चौकशीत कळाले की, समाजसेवी तिला परेशान करायचे. बलात्कार झाला नसला तरी त्याबद्दल बोलून तिला त्रास द्यायचे. चौकशीसाठी युवतीला नाही तर तिच्या पालकांना बोलवले होते. युवतीची साक्ष कलम 164 नुसार घेतली होती. चौकशीसाठी सखी सेंटरची मदत घेतली होती.
-डॉ. अभिषेक पल्लव, एसपी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.