Home | Maharashtra | Kokan | Thane | girl dead in thane

चौदा वर्षीय मुलीचा ठाण्यात संशयास्पद मृत्यू

divya marathi team | Update - May 29, 2011, 02:03 AM IST

मुंबई - ठाण्यातील चिरागनगर परिसरात राहणा-या शीतल या चौदा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २८) सकाळी वसंत विहार सोसायटीत घडली.

  • girl dead in thane

    मुंबई - ठाण्यातील चिरागनगर परिसरात राहणा-या शीतल या चौदा वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २८) सकाळी वसंत विहार सोसायटीत घडली. शीतल ही विक्रम जसरा यांच्या घरी कामासाठी आली असता ही घटना घडली. शीतलची आई वसंत विहार सोसायटीत मोलकरणीचे काम करते. शनिवारी काही कारणामुळे आईला कामावर जाणे शक्य नसल्याने शीतल घरकामासाठी जसरा यांच्या घरी गेली होती.

    जसरा यांची पत्नी गावी गेल्यामुळे जसरा हे एकटेच घरी होते. काही वेळानंतर इमारतीच्या पाय:यावर शीतल पडलेली लोकांना आढळली. नंतर जसरा आणि त्यांच्या शेजारच्या लोकांनी शीतलला लोक रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, हा प्रकार सुरू असतानाच जसरा अचानक गायब झाले होते. त्यामुळे जसरा यांनीच शीतलचा खून केल्याचा आरोप जमलेल्या जमावाने केला आहे. याप्रकरणी जसरा यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.

Trending