आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीने अडीच कोटींच्या कारवर शिव्या लिहून केली तोडफोड, राग पाहून लोक अडवायलाही धजावले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेडमध्ये एका तरुणीने अडीच कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारचा अक्षरशः चुराडा केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार अॅडिलेडमध्ये एका व्यक्तीने त्याची 'मर्सिडीझ-बेंज एस 63 एएमजी कूप' पार्किंगमध्ये भी केली होती. कारचा मालक गेल्यानंतर एक मुलगी त्याठिकाणी आली आणि तिने काळ्या कलर स्प्रेने कारवर काहीतरी आक्षेपार्ह लिहिले. तरीही तिचे मन शांत झाले नाही तर तिने एका बॅटने कारची तोडफोड केली. 

 

स्वतःदेखिल मर्सिडीजमध्ये आली होती 
मीडिया रिपोर्ट्सनुसार तरुणी स्वतः मर्सिडीज जी वॅगन कारमध्ये बसून आली होती. तिचे वय अंदाजे 20 वर्षे होते. त्याठिकाणच्या लोकांनी सांगितले की, तिने स्प्रेने कारवर दगाबाजसारखे काहीतरी लिहिले. नंतर तिने कारचे साइड मिरर तोडले. त्यानंतर ती त्याठिकाणाहून निघून गेली. अद्याप मुलीची ओळख पटलेली नाही. पोलिसांसाठी ही मिस्ट्री गर्ल डोकेदुखी ठरली आहे. पोलिस म्हणाले की, कार मालकाने हे कोणी आणि का केले असावे याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले आहे. 
 

प्रेमात दगाबाजीचे प्रकरण असण्याची शक्यता 
हे कोणी आणि का केले माहिती नसल्याचे कारमालक म्हणत असला तरी गाडीवर लिहिलेल्या शब्दांवरून हे प्रकरण प्रेमात दगाबाजीचे असण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या मते, आरोपी तरुणी कार मालकाला नक्कीच ओळखत असेल, असा पोलिसांना संशय आहे. 

बातम्या आणखी आहेत...