आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपबिती : नॉर्थ कोरियाला कंटाळून देश सोडला.. पण दुसऱ्या देशात वारंवार झाले बलात्कार, आणि सौदा.. डोळ्यासमोरच आईवरही रेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - ही आपबिती आहे नॉर्थ कोरियाच्या तरुणीची. तिने 13 व्या वर्षी हुकूमशहाच्या अत्याचाराला कंटाळून देश सोडला होता. पण दुसऱ्या देशात तिला जास्त वाईट अनुभव आला. तिला आणखी वाईट नरकात ढकलल्यासारखे वाटले. येथे आणणाऱ्या दलालाने आधी तिच्या डोळ्यासमोरच आईवर बलात्कार केला. कारण आईने मला त्याच्या ताब्यात द्यायला नकार दिला होता. नंतर त्याने आम्हाला दोघींना चीनच्या एका माणसाला विकले. पण सर्व एवढ्यावरच थांबले नाही. 


सर्व सीमा ओलांडल्या 
- नॉर्थ कोरिया सोडून इतर देशांमध्ये शरण घेमारी पार्क आता 25 वर्षांची झाली आहे. चायना अनसेंसर्ड शोमध्ये बोलताना तिने आपबिती सांगितली. 
- देशातील गुलामी सहन न झाल्याने तिने देश सोडण्याचा निर्णय घेतला. यालू नदी पार करत चीन बॉर्डरवर पोहोचून लाच देऊन ती आईसह चीनच्या सीमेत घुसली. 
- तिथून दुसऱ्या दलालाच्या मदतीने त्या चीनला आल्या. या दलालाने त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते. पण या दुसऱ्या देशात येताच सर्वकाही बदलले. 
- योनमीने सांगितले की, चीनमध्ये त्यांची अवस्था नॉर्थ कोरियापेक्षा वाईट झाली. दलालाची माझ्यावर वाईट नजर होती. त्याची किंमत माझ्या आईला मोजावी लागली. 
- तिने सांगितले की, दलालाला माझ्या अब्रू हवी होती. पण आईने नकार दिल्याने तिच्यावर बलात्कार झाला तोही माझ्या डोळ्यादेखत. 


आई-मुलीला विकले 
- या भयावह घटनेनंतर दलालाने मला आणि आईला एका चिनी व्यक्तीला विकले. आईला 5 हजारांत आणि मी तरुण आणि व्हर्जिन असल्याने मला 14000 हजारात विकले. 
- योनमीने सांगितले की, आमची खरेदी विक्री अशीच सुरू राहिली. अनेकदा पैशासाठी आमची विक्री करण्यात आली. प्रत्येकवेळी आमच्यावर बलात्रा झाले. पण हे सर्व होऊनही आम्हाला परत आमच्या देशात पाठवू नये म्हणून आम्ही शांत होतो. 
- या अत्याचारांना कंटाळून रोज विकल्या जाऊन बलात्कार होण्यापेक्षा माझ्या आईवर बलात्कार केलेल्या त्या जुन्या दलालाकडे परत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. कारण रोज विकल्या जाण्यापेक्षा मला त्याची मिस्ट्रेस बनून राहणे योग्य वाटले. 


जुन्या दलालाची मिस्ट्रेस बनले 
- योनमीने सांगितले की, माझ्या आईला परत खरेदी करून आणण्याच्या बोलीवर मी जुन्या दलालाकडे परत गेले होते. तसेच त्याने नॉर्थ कोरियातून माझ्या आजारी वडिलांना आणण्याचे आश्वासनही दिले होते. त्याने वचन पाळले देखिल. 
- योनमीने सांगितले की, ती दोन वर्षे त्याच्याबरोबर राहिले. त्याने तिची आणि तिच्या कुटुंबाची संपूर्ण व्यवस्था केली. याच दरम्यान तिच्या वडिलांचा कॅन्सरने मृत्यू झाला. येथून सुटका झाल्यानंतर योनमी आणि तिची आई मंगोलियाला पोहोचल्या आणि तेथून साउथ कोरियाला गेल्या. नंतर सेऊलमध्ये योनमीने हायस्कूल शिक्षण पूर्ण केले. 
- योनमी आता अमेरिकेत राहत आहे. ती सोशल अॅक्टिव्हीस्ट म्हणून काम करतेय. लग्नानंतर नुकताच तिने बाळाला जन्म जिला आहे. आता ती तिच्या जीवनावर 'इन ऑर्डर टू लिव्ह' नावाचे पुस्तक लिहित आहे. 

बातम्या आणखी आहेत...