आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लाइटमध्ये सँडविच खाल्ल्यामुळे झाला कोट्यधीशाच्या 15 वर्षीय मुलीचा मृत्यू, समोर आले असे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - इंग्लंडमधील एका कोट्यधीश व्यक्तीच्या 15 वर्षीय मुलीचा नुकताच धक्कादायक मृत्यू झाला. विमानामध्ये प्रवास करताना या मुलीने सँडविच खाल्ले होते. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. नताशा एडनान असे या तरुणीचे नाव आहे. 


नताशा लंडन हून फ्रान्सच्या नाइसला जात होती. तिने एअरपोर्टवर सँडविच खरेदी केले आणि ते खाल्ले होते. त्यानंतर अॅलर्जी झाल्याने तिचा मृत्यू झाला. नताशाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी उत्तरे मागवली आहेत. सँडविच खाल्ल्यानंतर विमानातच नताशाच्या शरिरावर लाल चट्टे पडायला सुरुवात झाली होती. त्याचवेळी तिला समजले की तिने काहीतरी चुकीचे खाल्ले आहे. 


नताशाला त्रास होऊ लागल्यानंतर तिला औषध देण्यात आले. पण नताशाला कार्डियाक अरेस्टचा सामना करावा लागला. त्यानंतर नाइस हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला. 
नताशाच्या वडिलांचा खेळण्याचा व्यवसाय आहे. ते म्हणाले आमच्यासाठी हे दुःख सहन करण्यापलिकडचे आहे. यावर आमचा विश्वासच बसत नाहीए. 


या प्रकरणी आता लंडनमध्ये एक चौकशी होणार असून सँडविच स्टोरला त्यांचे म्हणणे मांडावे लागणार आहे. सँडविच स्टोरने असे म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना प्रोडक्ट आणि अॅलर्जीशी संबंधित माहिती आधीच देत असतो. 

 

पुढील स्लाइडवर पाहा, नताशाचे काही PHOTO

बातम्या आणखी आहेत...