आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Girl Isolated In Hut Due To Superstition Over Puberty, Died After Tree Fell On It During Cyclone Gaja

भयंकर चक्रीवादळाचा होता अलर्ट, तरीही खुद्द आईवडिलांनी पीरियड्स आले म्हणून मुलीला केले घराबाहेर, 16 दिवस घरात यायला घातली बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई -  तामिळनाडूमध्ये नुकत्याच आलेल्या 'गज' चक्रीवादळामुळे हाहाकार माजला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवित हानी झाली होती. या वादळाच्या तडाख्यात 12 वर्षीय मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे जीव गमवावा लागला. मुलीला पीरियड्स आल्यामुळे तिला घराबाहेरील झोपडीत ठेवले होते. वादळादरम्यान त्याच झोपडीवर नारळाचे झाड कोसळल्यामुळे मुलीचा मृत्यू झाला. 

 

अंधश्रद्धेने घेतला मुलीचा बळी

> ही धक्कादायक घटना तंजावर जिल्ह्यातील पुट्टुकोट्टाई भागातील अनाईकादु गावात घडली. वादळादरम्यान गावात राहणाऱ्या सेल्वाराज आणि भानुमती यांच्या 12 वर्षीय मुलीचा नारळाच्या झाडाखाली दबल्याने मृत्यू झाला. 

> विजयाचा मृत्यू कुटुंबीयांच्या अंधश्रद्धेमुळे झाला. तिला पहिल्यांदाच मासिक पाळी आली होती. परंपरेनुसार मासिक पाळी आल्यावर मुलीला अपवित्र मानत घरापासून दूर एकट्याने झोपडीत राहावे लागते. 16 दिवसांनंतर सर्व धार्मिक क्रिया पार पाडल्यानंतर तिला घरात प्रवेश मिळतो.  

> विजयाच्या आई-वडिलांनी परंपरेचे पालन करण्यासाठी विजयाला घराबाहेरील झोपडीत राहण्यास सांगितले. दरम्यान, राज्यात आलेल्या चक्रीवादळामुळे प्रशासनाने लोकांना सावधगिरी बाळगण्यासाठी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा इशारा दिला होता; पण विजयाच्या कुटुंबीयांनी याकडे दुर्लक्ष केले.
  
> स्थानिक प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करणे त्यांना महागात पडले. विजयाच्या रूपात त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. वादळामध्ये एक नारळाचे झाड विजया राहत असलेल्या झोपडीवर कोसळले. झाडाखाली दबल्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेदरम्यान तिची आई तिच्यासोबतच होती. 

> याप्रकरणी पट्टुकोट्टाईचे DSP गणेशमूर्ती यांनी सांगितले की, 'एका प्राचीन परंपरेनुसार मुलीला प्रथमत: मासिक पाळी आल्यावर तिला घराबाहेर राहण्यास सांगितले जाते. विजयासोबत असेच घडले होते.' 

> अहवालानुसार विजया राहत असलेल्या झोपडीचा धान्याचे गोदाम म्हणून वापर करण्यात येत होता.

 

बातम्या आणखी आहेत...