आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओ कॉल सुरू होता, नशीब आजमावण्यासाठी स्वतःवर रोखली रिव्हॉल्वर.. अन् कट झाला कॉल..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर - मैत्रिणीबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना केलेल्या गमतीमुळे 21 वर्षीय करिश्माने स्वतःचा जीव गमावला. गंमत करताना तिने चुकून स्वतःवर गोळी झाडून घेतली. 72 तास रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. ग्वाल्हेरच्या नारायण विहार कॉलनीमध्ये ही घटना घडली होती. करिश्माचे वडील निवृत्त सुभेदार होते. ते पत्नीबरोबर चित्रकूटला गेले होते. तर लष्करात असलेला त्यांचा मोठा मुलगाही सुटीवर घरी आलेला होता. पण त्यादिवशी तो इटावा मध्ये गेला होता. तर लहान मुलगा दहावीत शिकत होता. करिश्मा त्यादिवशी घरी एकटी होती. 

 

30 मिनिटांत घडले सर्व काही.. घरात खेळत होती लक-लक 
11.30 वाजता
- करिश्मा घरात एकटी होती. चित्रकूटहून वडिलांनी फोन करून काय चाललंय ते विचारले. मुलाबाबत विचारले तेव्हा तिने सांगितले की, त्याने डबा नेलाच नाही तो घरी विसरला. 
11.45 वाजता - दिल्लीतील करिश्माची मैत्रीण नजमाचा तिला कॉल आला. त्यानंतर दोघी व्हिडिओ कॉलवर बोलू लागल्या. करिश्माच्या जवळ रिव्हॉल्वर ठेवलेली होती. मैत्रिणीने विचारले रिव्हॉल्वर का ठेवली आहे, तर करिश्मा म्हणाली लक-लक खेळत होते. 
11.50 वाजता : फोन कॉल सुरू अशताना करिश्माने स्वतःच्या डोक्यावर रिव्हॉल्वर ठेवली आणि म्हणाली एकच गोळी आहे, बघुया आज लक काम करते की नाही. नजमाने तिला अडवले तेवढ्यात नेटवर्क गेले आणि कॉल कट झाला. त्याचवेळी करिश्माने ट्रिगर दाबले होतो आणि गोळी चालली. 
12 वाजता : हनजमाने पुन्हा कॉल केला तर करिश्मा अडखळत तिला म्हणाली-यार गोळा चालली.. त्यानंतर फोन कट झाला. नजमाकडे तिच्या नातेवाईकांचा नंबर नव्हता. तिने पुन्हा पुन्हा करिश्माला फोन केले. मोबईलवर 17 मिस्ड कॉल होते. 


सशस्त्र सीमा दलात पहिल्या टप्प्यात झाली होती निवड.. मुलाखतीची तयारी करत होती 
करिश्मा अभ्यासात हुशार होती. वडिलांची लाडकी होती. तिचे वडील काही दिवसांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते. मुलीने बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले होते. तिला सीडीएसची तयारी करायची होती. करिश्माने एनसीसी सी - सर्टिफिकेट कोर्सही केला होता. तिने लष्करात अधिकारी व्हावे हे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. एसएसबी (सशस्त्र सीमा दल) च्या पहिल्या टप्प्यात तिची  निवडही झाली होती. इंटरव्ह्यू 1 डिसेंबरला होणार होता. त्याच्या तयारीसाठीच ती ग्वाल्हेरला आली होती. 

 
भावाला वाटले बाथरूममध्ये पडली 
अपघातानंतर करिश्माजवळ सर्वात आधी लष्करात असलेला तिचा मोठा भाऊ शिवम पोहोचला. ठरलेल्या वेळेच्या एक दिवस आधी तो ग्वाल्हेरला परतला होता. दुपारी 12.45 वाजता बराच वेळ दार वाजवूनही कोणी दार उघडले नाही तेव्हा तो मागच्या भिंतीवरून घरात सिरला. आत करिश्मा लोटलेली त्याला दिसली. तिचे डोळे सुजले होते, बोलता येत नव्हते आणि डोक्यातून रक्त वाहत होते. शिवमला वाटले ती बाथरूममध्ये पडली असावी, तो आधी करिश्माला बिर्ला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिला दाखल करून घेतले नाही. नंतर जेएएच हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन केले तेव्हा गोळी दिसली. पण तोपर्यंत 5 तास निघून गेले होते. बरेच रक्त वाहिले होते. त्यानंतर तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून ऑपरेशनद्वारे गोळी काढली. पण तरीही ती वाचू शकली नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...