आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचा बळी : पाणी शेंदताना विहिरीत पडून मुलीचा करुण अंत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या परळी तालुक्यात सोमवारी विहिरीतून पाणी शेंदताना विहिरीत पडून १० वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. रूपसिंग तांडा येथे ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. 
परळी तालुक्यातील मैंदवाडीपासून जवळच रुपासिंग तांडा आहे. मैंदवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या या तांड्यावर यावर्षी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ७००  लोकसंख्या असलेल्या या तांड्यासाठी असलेल्या नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना एक ते दीड कि.मी. वरून पाणी आणावे लागते.

 

सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कामका संतोष राठोड (वय १०) ही मुलगी आठवर्षीय चुलत भाऊ कृष्णासोबत तांड्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रामचंद्र होळंबे यांच्या  विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेली होती. विहिरीतून घागरीने पाणी काढताना पाय घसरून ती विहिरीत पडली. हे पाहताच कृष्णा आरडा ओरडा करत घराकडे धावला. विहिरीत ४ फूट पाणी असल्याने व पोहणे येत नसल्याने ती पाण्यात बुडाली. कृष्णाने घटना सांगताच तांड्यावरील काही युवक विहिरीकडे धावले. पणा तोपर्यंत कामकाचा  पाण्यात बुडून अंत झाला. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मंगळवारी दुपारी चिमुकलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.