आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी होती डोकेदुखीने ग्रस्त, डॉक्टरांना वाटले डोक्यात पाणी असेल, एमआरआय करण्यासाठी गेली ती परतलीच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेवोन - इंग्लंडमधील 14 वर्षीय मुलगी डोकेदुखीने ग्रस्त होती. मेंदूमध्ये पाणी असल्याचा डॉक्टरांना संशय आला होता आणि त्यांनी एमआरआय करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सांगितले की अॅनेस्थेसिया देऊन तिचे एमआरआय केले जाऊ शकते म्हणजे ती स्कॅनला सामोरी जाईल. पण एमआरआयच्या दरम्यान, मुलीच्या हृदयाने काम करणे बंद केले. डॉक्टरांनी तिला दोन दिवस लाइफ सपोर्ट वर ठेवले आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. पालकांचे म्हणणे आहे की, जर एमआरआय करायच्या अगोदर डॉक्टरांनी मुलीच्या हृदयाची तपासणी केली असती तर ती वाचली असती.

 

नियमित तपासणीने घेतला जीव

>  डेव्हॉनमध्ये राहणा-या सारा आणि नाथान यांची 14 वर्षांची मुलगी एलिस डोकेदुखीच्या त्रासाने ग्रस्त होती. डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली असता डॉक्टरांनी तिला एमआरआय करण्याचा सल्ला दिला.

> एलिस आधीच अनेक आरोग्यविषयक समस्यांशी लढत होती. तिला नीट दिसतही नव्हते आणि तिच्या हातपायांची हालचाल योग्यरित्या होत नव्हती.

> अशा परिस्थितीत, डॉक्टरने एलिसला प्रथम जनरल ऍनेस्थेटिक देण्याचे ठरवले, जेणेकरून ती स्कॅन करू शकेल. त्यानंतर तिचा एमआरआय केला जाईल.
> पण एमआरआय मशीनमध्ये जाताच तिच्या हृदयाचे ठोके अचानक उंचावले आणि अचानक खाली आले. त्याचवेळी, एलिसचा रक्तदाब एकदम खाली आला.

> बघता बघता तिच्या हृदयाच्या उर्वरित भागांनी कार्य करणे थांबवले. तिला लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आणि तीन दिवसांनी अॅलिसने जगाचा निरोप घेतला.

> लाइफ सपोर्ट ठेवल्यानंतर लक्षात आले की अॅलिस कार्डिओमायोपॅथी, म्हणजे हार्ट मंप आणि न्यूमन सिंड्रोम आजाराने ग्रस्त आहे. पण त्याबद्द्ल डॉक्टरांना काहीच माहित नव्हते.

> या सिंड्रोममुळे हृदयाच्या समस्येसोबत मुलांचा शारिरीक वाढ होत नाही. मुले थोडी मोठी होईपर्यंत या आजाराबद्दल माहिती मिळत नाही.

 

इतरांना सावध करत आहेत पालक..

> अॅलिसच्या पालकांनी म्हणणे आहे की, जर डॉक्टरांनी अॅनेस्थेसिया देण्याआधी त्यांच्या मुलीची तपासणी केली असती तर पुढील दुर्घटना घडली नसती. डॉक्टरांच्या चुकीमुळे आमची मुलगी आमच्यापासुन दूर गेली आहे. 

> अॅलिसचा उपचार करणारो टॉर्बे हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे देखील असा विश्वास होता की अॅलिस ह्रदयाच्या समस्येचा सामना करत होती. 14 वर्षांच्या मुलीच्या हृदयापेक्षा तिचे हृदय कमकुवत होते.

> आपल्या मुलीच्या प्रकरणातून धडा घेतल्यानंतर, रुग्णालयात शिबीर घेत आहेत. मुलांच्या ह्रदयाच्या समस्यांबद्दल पालकांना सुचित करत आहे. हृदय चाचणी घेतल्यानंतर अॅनेस्थेसिया देण्याचा सल्ला देत आहेत.

> सारा म्हणते की, छोट्याशा चुकीमुळे आम्ही आमच्या मुलीला गमावले, परंतु इतर कोणीही अशाप्रकारे आपल्या मुलांना गमावू नये असे वाटते. 

 

बातम्या आणखी आहेत...