आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेकडीवरून पाय घसरून तरुणीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाल्मी परिसरातील टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीचा पाय घसरून टेकडीवरून पडून उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. पार्वती गोरेलाल जमरे (१८, ह. मु. कांचनवाडी, मूळ रा. वडवानी, मध्य प्रदेश) असे मृत तरुणीचे नाव आहे. रविवारी दुपारी दोन च्या सुमारास पार्वती वाल्मी जवळील टेकडीवर फिरण्यासाठी गेली होती. टेकडीवरून खाली उतरत असताना तिचा अचानक पाय घसरला व ती खाली कोसळली. डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या पार्वतीला तिचे वडील गोरेलाल यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु ट्राॅमा केअर विभागामध्ये उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता तिचा मृत्यू झाला. 
 

बातम्या आणखी आहेत...