आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजाराच्या बाथरूममध्ये पडली 7 वर्षीय चिमुकली, 4 दिवस फक्त पाण्यावर जिवंत राहिली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद(तेलंगाना)- येथील मक्थलमधून चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील एक 7 वर्षीय मुलगी शेजाऱ्याच्या बाथरूममध्ये पडली. शेजारी घरात नव्हते, ते बाहेर गेले होते. चार दिवस मुलगी फक्त पाणी पिऊन जिवंत राहिली.


पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, घटना 20 एप्रिलची आहे. मुलगी आपल्या घराच्या छतावर खेळत होती. यावेळी खेळता-खेळता ती पडली आणि प्लास्किटच्या नेटच्या साहाय्याने ती शेजाऱ्याच्या बाथरूममध्ये पोहचली. त्यानंतर कुटुबीयांनी तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही आणि शेवटी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली.


24 एप्रिलला जेव्हा शेजारी परतले तेव्हा त्यांनी बाथरूममध्ये मुलीला बुशुद्ध अवस्थेत पाहिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सुचना दिली आणि मुलीला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे.

 

मुलगी त्या बाथरूममध्ये चार दिवस फक्त पाणी पिऊन जिवंत राहिली. मुलगी पडली तेव्हा प्लास्टिकची नेट होती, त्यामुळे तिला कोणतीच जखम झालेली नाहीये.

बातम्या आणखी आहेत...