आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Honour Killing: मुलीच्या बॉयफ्रेंडला प्रेमाने घरी बोलावले; मग 6 जणांनी मिळून केले असे काही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानीपत - हरियाणात या शहरात एका युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयाच्या गेटवर फेकून देण्यात आला. तीन दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या फोटोवरून मृतदेहाची ओळख पटली. त्याच फोटोवरून या प्रकरणाचा खुलासा झाला. युवकाच्या वडिलांनी या हत्येसाठी एका तरुणीच्या पित्यासह 6 जणांना जबाबदार धरले आहे. यानंतर पोलिसांनी 4 जणांना अटक करून त्यांची कसून चौकशी केली. या प्रकरणातील उर्वरीत आरोपी फरार आहेत. सोबतच, त्या तरुणीचा देखील पत्ता लागला आहे. 


हरिद्वारला जातो म्हणून निघाला होता -वडील
पानीपतच्या परढाणा येथे राहणारे सतिश यांनी सांगितले, की त्यांचा मुलगा मनजीत (30) गावातच असलेल्या अल्ट्राटेक सिमेंट फॅक्ट्रीत कॅन्टीन चालवत होता. तो पानीपत रोडवेजमध्ये ड्राइव्हिंग लायसेंस बनवण्यासाठी ट्रेनिंग घेत होता. 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी तो रोडवेजमध्ये भंडरा आयोजित करण्यात आल्याचे सांगून बाइकवर निघाला होता. आपण भंडारा झाल्यानंतर हरिद्वारला जात आहोत असेही तो म्हणाला होता. परंतु, त्या दिवशी रात्री 9 वाजता त्याचा फोन स्विच ऑफ झाला. मुलाचा खूप शोध घेतला तरीही काही पत्ता लागला नाही. 


2 लेकरांचा बाप होता मनजीत... फेसबूकवर झाली तरुणीशी मैत्री...
> 10 ऑगस्ट रोजी सकाळी सरकारी रुग्णालयाच्या ईएसआय विभागाच्या गेटवर अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला. त्या युवकाकडे कुठल्याही प्रकारचा आयडी प्रूफ नव्हता. पोलिसांनी मेडिकल बोर्डकडून पोस्टमॉर्टम केल्यानंतर रुग्णालयाच्या शवागारात त्याचा मृतदेह ठेवला. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनीच युवकाच्या मृतदेहाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर युवकाच्या वडिलांसह इतर नातेवाइकांनी पोलिस स्टेशन गाठले. तसेच तो आपला मुलगा मनजीत असल्याचे सांगितले. 
> वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, मनजीत फेसबूकवर रेरकला गावातील एका तरुणीच्या संपर्कात आला होता. त्या दोघांची मैत्री आणि संवाद वाढत गेला. दोघांमध्ये रोज बोलणे सुरू होते. ती तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. मनजीत आधीच विवाहित आणि दोन मुलांचा बाप होता. ही गोष्ट त्या तरुणीच्या कुटुंबियांना कळाली तेव्हा त्यांनी मनजीतला आपल्या गावात प्रेमाने बोलावून घेतले. यानंतर त्याचा निर्घृण खून करून मृतदेह रुग्णालयाच्या गेटवर फेकला. दोन भावांमध्ये तो सर्वात लहाना होता आणि त्याचे वडील पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...