आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने म्हाताऱ्याशी केले लग्न, दोघेही होते जाम आनंदी; अचानक घरात दिसला तिच्या वडिलांचा फोटो अन् पायाखालची वाळूच सरकली...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मियामी - अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने एका म्हाताऱ्याशी लग्न केले आणि ते तिचे आजोबा असल्याचे तिला लग्नानंतर समजले. दोघे लग्नानंतर आनंदी होते. मियामीच्या गोल्डन बीचवर ते राहत होते. पण एक दिवस तरुणीला अचानक हे सत्य समजले. पण तरीही दोघांना याने काही फरक पडत नसून ते अजूनही एकत्र राहू इच्छितात.


जुन्या अल्बममुळे समजले... 
लग्नाच्या तीन महिन्यांनंतर ही तरुणी नवऱ्याच्या घरातील जुने फोटो पाहत होती. त्याचवेळी तिला एक जुना फोटो दिसला. त्यात वडिलांचा फोटो पाहून ती हैराण झाली. तिच्या नवऱ्याने सांगितले की तो त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. त्यावेळी तरुणीच्या लक्षात आले की, ज्यांच्याशी तिने लग्न केले ते तिचे सख्खे आजोबा आहेत. 

 

नातीबरोबर लग्नाबाबत या म्हाताऱ्याने सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी माझी पत्नी मला सोडून मुलांना घेऊन निघून गेली होती. त्यानंतर मी पुन्हा त्यांना भेटलो नाही. मी दुसरे लग्न केले. मला काही मुलेही झाली. पण ते लग्नही 2009 ला घटस्फोटामुळे टिकले नाही. त्यानंतर त्यांना कोट्यवधींची लॉटरी लागली आणि एका डेटींग एजन्सीच्या माध्यमातून एका 24 वर्षांच्या मुलीला भेटल्यानंतर त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले. लग्नापूर्वी त्यांच्या कुटुंबांबाबत फारशी चर्चा झाली नव्हती. ही तरुणी प्रेग्नेंट झाल्याने तिच्या वडिलांनी तिला घराबाहेर काढले होते. 


..तरीही राहणार एकत्र
तरुणी म्हणाली की, याबाबत समजल्यानंतर ती निराश झाली. पण तिचे असे म्हणणे आहे की, आमचे नाते फार घट्ट आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना सोडणार नाही. त्यामुळे सर्वकाही माहिती असूनही ते एकत्र आहेत. तर म्हाताऱ्याचे असे म्हणणे आहे की, माझी दोन लग्ने मोडली आहेत, आता पुन्हा तिसरे लग्न मोडायला नको. त्यामुळे आम्हाला या नात्यात काहीही आडचण नाही.

 

बातम्या आणखी आहेत...