आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीच्या विद्यार्थिनीला मैत्रिणीने अचानक रात्री फोन करून बोलावून घेतले, परंतु ती पोहोचल्यानंतर घडले वेगळेच काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखीसराय (बिहार) - जिल्ह्यातील नववीची एका मुलीने बलात्कारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. उडी मारल्यानंतर पहिले ती लाईटच्या हायटेंशन तारांवर पडली. ही घटना सदर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. घटनेच्या विरीधात शुक्रवारी कुटुंबीय आणि परिसरातील लोकांनी रास्तारोको केला. घटनास्थळावर पोलिसांनी पोहोचवून लोकांना समजावण्याचा खूप प्रत्यन केला. मात्र लोकांनी पोलिसांचे काहीही ऐकून घेतले नाही आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला.


मुलीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी
संतर परिसरातील निवासी किशोरीला तिच्या मैत्रिणीने गुरुवारी रात्री केकेएस कॉलेजजवळ बिपीन सिंह नामक व्यक्तीच्या घरी बोलावले होते. घरामध्ये पूर्वीपासूनच तीन तरुण होते. तिघांनीही दारू पिलेली होती. या तिघांनी बळजबरीने तिला दारू पाजण्याचा आणि तिची आब्रू लुटण्याचा प्रयत्न केला. मुलीने स्वतःला वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे ती हाय व्होल्टेज लाईटच्या तारांवर जाऊन पडली आणि गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले.


पोलीस मुलीच्या मैत्रिणीची करत आहेत चौकशी
पोलिसांना बिपीन सिंहच्या घरात दोन विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या प्रकरणात पोलीस किशोरीची मैत्रीण सोनम आणि दोन तरुणांची चौकशी करत आहेत. लखीसरायचे एसपी कार्तिकेय शर्मा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...