आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅफेतून १५ मिनिटांत येते म्हणालेल्या मुलीचा सायंकाळी आढळला मृतदेह, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबाची मागणी

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा विरोध

जालना - इंटरनेट कॅफेतून पंधरा मिनिटांत येते म्हणून आईला सांगत मुलगी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घराबाहेर पडली. बराचवेळ झाल्यानंतर मुलगी घरी आली नाही म्हणून आईने फोन लावले. परंतु, कधी फोन कट, तर कधी फोन उचलत नसल्यामुळे आईने या प्रकाराची तिच्या परतूरकडे रेल्वे प्रवासात वडिलाला माहिती दिली. यानंतर वडिलानेही त्यांच्या दूरध्वनीवरून तब्बल ३० ते ३५ वेळा फोन लावले. परंतु, तेव्हाही फोन कट करणे, आवाज न येण्याचे प्रकार झाले. यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळावर मुलीचा मृतदेह आढळून आल्याची घटना जालन्यातील मोती बागेजवळील म्हाडा कॉलनीला लागून असलेल्या रेल्वे रुळाजवळ घडली. दीपाली रमेश शेंडगे (म्हाडा कॉलनी, जालना) असे मृत मुलीचे नाव आहे. 


मत्स्योदरी कॉलेजच्या पाठीमागे म्हाडा कॉलनीचा भाग आहे. या भागात शेंडगे हे कुटुंब राहते. शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दीपाली शेंडगे या मुलीने शैक्षणिक कामानिमित्त आईस मी नेट कॅफेतून येते, असे सांगून बाहेर पडली. परंतु, बराचवेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही म्हणून तिच्या आईने वारंवार फोन लावले. परंतु, फोन कट होणे, आवाज न येण्याचे प्रकार होत असल्यामुळे आईने त्या मुलीच्या वडिलाला या प्रकाराची माहिती दिली. मुलगी माझा फोन उचलत नाही, तुमच्या फोनहून लावा, असे सांगितले. रमेश शेंडगे कामानिमित्त परतूर येथे रेल्वेने प्रवास करत होते. त्यांनी सुद्धा त्यांच्या फोनहून ३० ते ३५ वेळा फोन लावले. परंतु, वारंवार फोन कट होणे, त्याला प्रतिसाद न देण्याचे प्रकार होत होते. परतूर येथून रेल्वेस्थानकातून त्यांना जालन्यात येण्यासाठी दीड तास लागला. परंतु, जालन्यात आल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. या दुर्दैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा विरोध 

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. परंतु, नातेवाइकांनी मुलीचा खूनच झाला आहे. याप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 

खुनाचा गुन्हा नोंद करणाऱ्याचे आश्वासन

जो काही प्रकार असेल तो लवकरच उघड करू. नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांची समजूत काढली. यानंतर नातेवाइकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. - सुधीर खिरडकर, डीवाएसपी, जालना.

बातम्या आणखी आहेत...