आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकलमधून पडताना जीव वाचलेली मुलगी मागील काही महिन्यांपासून घरातून पळालेली, यापूर्वी दोनदा घर सोडलेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तीन दिवसांपूर्वी लोकलच्या दारातून पडताना जीव वाचलेल्या मुलीचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सर्वत्र व्हायरलही झाला. परंतु आता समोर आलेल्या माहितीमध्ये एक नवीनच सत्य समोर आले आहे. या घटनेचा तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, लोकलमधून पडताना वाचलेले मुलगी जून महिन्यापासून घरातून पळून आलेली आहे.


या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सेंट्रल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF)ने या मुलीला ताब्यात घेतले परंतु नंतर मुंब्रा पोलसांनी त्या मुलीला ताब्यात घेतले. कारण मागील काही महिन्यांपासून 17 वर्षांची मुलगी मिसिंग असल्याचा तपास पोलीस करत होते. तपासामध्ये या मुलीचे नाव पूजा भोसले असल्याचे समोर आले असून ही मुंबईतील दिवा भागातील आहे. 


पीआय के.सी. पसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही मुलगी यापूर्वीही दोनदा घरातून पळून गेली होती परंतु तिच्या आईने तिला परत आणले होते. तिचा एक बॉयफ्रेंड असून जून महिन्यात आईला क्लासला जाते असे सांगून ती घरातून पळून गेली. आम्ही या मुलीचा शोध घेत होतो आणि अचानक ती आम्हाला या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसली. आम्ही तिला मुंब्रा पोलीस स्टेशमध्ये घेऊन आलो आणि तिची चौकशी केली. एवढे महिने कुठे होती असे विचारले असताना तिने काहीही उत्तर दिले नाही."

बातम्या आणखी आहेत...