आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जमुई (बिहार) - बिहारच्या जमुईमध्ये बॉयफ्रेंड आणि त्याच्या मित्रांसोबत फिरायला आलेल्या एका विद्यार्थिनीवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. सूत्रांनुसार, पीडित विद्यार्थिनी घरच्यांना ट्यूशनला चालल्याचे सांगून गेली होती. ती प्रियकरासोबत कैलाश डॅमकडे फिरण्यास गेली. येथे डॅमला लागून असलेल्या जंगलात ती आपल्या प्रियकरासोबत फिरत होती. दरम्यान, तेथे 4 तरुणांनी विद्यार्थिनी आणि तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पकडून मारहाण केली. मग तरुणीला जंगलात नेऊन तिच्यावर गँगरेप केला.
असे आहे प्रकरण...
पीडित विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस अधिकारी मनीष कुमार यांनी घटनेला दुजोरा देत म्हटले की, गँगरेपमध्ये सामील सर्व आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. सर्वांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.
जंगलाला लागून निर्मनुष्य परिसरात फिरताना घडली ही घटना..
जबाबात पीडित तरुणीने 4 जणांनी गँगरेप केल्याचे सांगितले आहे. तिने सांगितले की, जंगलाला लागून असलेल्या निर्मनुष्य जागेवर ती बॉयफ्रेंडसोबत फिरत होती, तेवढ्यात काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी तेथे त्यांना अडवले. सर्वांना आम्हा दोघांना बेदम मारहाण करून तेथून पिटाळून लावले. यानंतर सर्वांनी तरुणीला पुन्हा पकडून आळीपाळीने गँगरेप केला.
पीडितेला बेशुद्धावस्थेत सोडून फरार झाले नराधम...
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी मारहाण केल्यानंतर पीडितेचा मित्र पळत गावात पोहोचला आणि गावातील मित्र तसेच पोलिसांना माहिती दिली. यानंतर सिकंदरा व चंद्रदीप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत आरोपी पीडितेला बेशुद्ध सोडून पसार झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळावरून पीडितेला उचलून उपचारांसाठी अलीगंजमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचारांनंतर पीडितेला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. येथे महिला पोलिस अधिकारी रिता कुमारी यांनी गँगरेप पीडित तरुणीचा जबाब नोंदवला. पोलिसांच्या माहितीनुसार, सर्व आरोपींच्या अटकेसाठी पथके तैनात केली असून छापेमारी केली जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.