आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नी नको-नको म्हणत होती तरी सुहागरात्रीला पतीने खाल्ली ही चुकीची वस्तू, मग घडले असे की..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतापगड (युपी) - विवाह बंधनामध्ये अडकल्यानंतर पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांच्या भावनांची जाणीव ठेवणे गरजेचे असते. पण आपल्या आधीच्या आयुष्याला पूर्णपणे मागे सोडून पतीच्या घरी येणाऱ्या मुलीला जर लग्नानंतर पहिल्याच रात्री म्हणजे मधुचंद्राच्या रात्री छळ सोसावा लागला तर तिच्यासाठी यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. असेच काही घडले उत्तर प्रदेशमधील प्रतापगडल येथे. पत्नीने वारंवार नको म्हणूनही पतीने पान मसाला खाल्ला. पत्नीने त्याला विरोध केला तर तिला मारहाणही करण्यात आली. 
 
पत्नीने अनेकदा अडवले, पण पतीने ऐकलेच नाही 
लग्नाच्या दिवशी पती पत्नी दोघेही अत्यंत आनंदात होते. मधुचंद्राच्या रात्री जेव्हा पती खोलीमध्ये आला तेव्हा पत्नीने दुधाचा ग्लास समोर करत त्याचे स्वागत केले. त्यानंतर काहीवेळाने पतीने पान मसाला खाल्ला. पत्नीने त्याला अनेकदा पान मसाला खाण्यास मनाई केली. पान मसाला कसा हानीकारक असतो हेही पत्नी सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण पतीने काहीही ऐकले नाही आणि पान मसाला खाल्ला. 
 
पत्नीला केली मारहाण
पतीने ऐकले नाही म्हणून पत्नी चिडली आणि तिने त्याला विरोध केला तेव्हा पतीला राग आला आणि त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर पत्नीने पतीबरोबर सर्व नाती संपवण्याचा निर्णय घेतला. मधुचंद्राच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पतीला सोडून गेली. ही बातमी गावात आणि पंचायतीपर्यंत पोहोचली. महिलेने पंचायतीसमोरही तिचे म्हणणे मांडले पण तिला कोणाचीही साथ मिळाली नाही. उलट तिला बरे वाईट बोलले गेले. त्यामुळे रागात महिलेने पंचायतीसमोरच पतीबरोबर सर्व नाते मोडले आणि एकटीच माहेरी परतली. महिलेच्या कुटुंबायांनी सासरचे लोक आणि पतीच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...