आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असल्यापासून पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला आईने न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळे १४ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात अाली. आष्टी तालुक्यातील या घटनेत गुरुवारी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. सहायक सरकारी वकील अॅड. राम बिरंगळ यांनी या प्रकरणी युक्तिवाद केला.
पीडित मुलगी आई- वडील व भावासह राहत होती. ती तिसरीत असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केला. मुलीने आपबीती आपल्या आईला सांगितली. याबाबत तिने पतीला जाब विचारला तेव्हा त्याने याचा इन्कार केला. मात्र, त्याच्यात सुधारणा झाली नाही. उन्हाळी सुट्यांमध्ये पीडित मुलगी आजोळी गेली. तेथे तिने आपल्या मामीच्या कानावर ही माहिती घातली. दरम्यान, नराधम पित्याच्या वर्तणुकीला कंटाळून नातेवाइकांनी मुलीला शिक्षणासाठी पुण्यात ठेवले. तेव्हा ती आठवीच्या वर्गात शिकत होती. नराधम पित्याने तिच्यावर सहा वर्षे अत्याचार केला. मुलीने वसतिगृहाच्या अधीक्षिकांना याबद्दलची माहिती दिली. त्यांनी तिला पुण्यात बालकल्याण समितीसमोर हजर केले व पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पित्याविरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. हे प्रकरण तपासासाठी आष्टी पोलिसांकडे वर्ग झाले. सहायक निरीक्षक शरद भुतेकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते.
‘मनोधैर्य’मधून सानुग्रह अनुदान द्या
पीडित मुलीचे सध्या शिक्षण सुरू आहे. पित्याच्या विक्षिप्त वागण्याने कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. पीडितेची आई आता दुसऱ्या जिल्ह्यात स्थायिक झाली. न्यायालयाने पीडितेला ‘मनोधैर्य’ योजनेतून तत्काळ सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.