आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिडनी - ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या 3 वर्षांच्या मुलीला जेव्हा ताप आला तेव्हा त्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या पोटाचा आजार असल्याचे सांगत काही औषधे देऊन घरी पाठवले. त्याठिकाणाहून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीची तब्येत आणखी बिघडली. ती बेशुद्ध झाली आणि तिच्या अवयवांनीही काम करणे बंद केले. हॉस्पिटलमध्ये तिला पुन्हा तपासले तेव्हा समजले की, तिच्या मेंदूला सूज आली आहे. तापामुळे असे झाले होते. सध्या ही चिमुरडी हॉस्पिटमध्ये आहे. तेथून इतर पॅरेंट्सला ती तापाच्या धोक्याबाबत इशारा देत आहे.
डॉक्टरांना समजलेच नाही
- सिडनीच्या मारिया स्ट्रो नावाच्या महिलेची तीन वर्षांची मुलगी किवर्नीबरोबर हे घडले. ती सद्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. मारियाने सांगितले की, किवर्नीला ताप आल्याने आम्ही तिला नेहमीचे औषध दिले. त्याने ती बरी होईल असे वाटले होते.
- पण किवर्नी बरी झाली नाही. उलट तिचा ताप वाढत गेला. तिच्या शरीराचे तापमान 41.3 डिग्री सेल्सिअस जाले होते आणि ती सारख्या उलट्या करत होती. त्यानंतर त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. काही ब्लड टेस्टनंतर डॉक्टरांनी तिला पोटाचा आजार असल्याचे सांगितले. त्यानंतर डिहायड्रेशनचे औषध देत तिला घरी नेण्यास सांगितले.
- हॉस्पिटलमधून आल्यानंतर त्याच रात्री मुलीची तब्येत जास्त बिघडली. सकाळी तर तिचे अवयवही काम करत नव्हते. ती जवळपास बेशुद्धच झाली होती. त्यानंतर तिला पुन्हा हॉस्पिटलला नेले.
नंतर समजला खरा आजार
- हॉस्पिटलमध्ये आधी तिचे CT स्कॅन जाले. त्यानंतर MRI करण्यात आले. त्यात फ्लूमुळे तिच्या मेंदूला सूज आली आणि काही जखमा झाल्याचेही समजले. या दुर्मिळ स्थितीला वैद्यकीय भाषेत अॅक्यूट नेक्रोटिसिंग अँसेफेलोपॅथी म्हटले जाते. ते इन्फ्लुएंजा व्हायरसमुळे होते.
- या व्हायरसमुळे मुलीचे चालणे-फिरणे, खाणे-पिणे आणि बोलणेही बंद झाले होते. आता मारिया इतर पॅरेंट्समध्ये या आजाराबाबत जनजागृती पसरवत आहे.
- पालकांना मुलांबाबत जास्त माहिती असते. जराही संशय आला तर इतरांवर विश्वास न ठेवता आपल्या मनाचे ऐका असे मारियाचे म्हणणे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.