आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवस्त्र अवस्थेत मिळाला शीर नसलेला तरूणीचा मृतदेह, बलात्कार करून घेतला जीव, पाहणाऱ्यांनी बंद केले डोळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाजीपूर (बिहार)- महुआ परिसरातून रविवारी सकाळी अज्ञात तरूणीचा शीर कापलेला विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला. घटनास्थळी सगळीकडे रक्त पडले होते, शिवाय पोलिसांना घटनास्थळावरून वार केलेले हत्यारदेखील सापडले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आणि आसपासच्या गावातून एखादी तरूणी गायबतर नाहीये ना याचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. पोलिसांना संशय आहे की, लांबून तरूणीचे अपहरण करून येथे आणले आणि बलात्कार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला. 


गुराख्याने पाहिला मृतदेह
सकाळी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या गुराख्याची मृतदेहावर नजर पडली. त्याने येऊन गावातील लोकांना सुचना दिली. त्यानंतर हजारो लोक घटनास्थळी पोहचले.


रात्री बलात्कारानंतर केला खून
शीर नसलेल्या अवस्थेत तरूणीचा मृतदेह आढळला. शिवाय तरुणीच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तरूणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह पाहून गावातील व्यक्तीने पॉलिथीनने मृतदेह झाकला. ग्रामस्थांकडून सुचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांना विचारले पण कोणालाच ती मुलगी कोण आहे हे माहित नव्हते. आसपासच्या गावातून तरूणी बेपत्ता असल्याची माहितीदेखील पोलिसांना मिळाली नाहीये. 


मृतदेहाला पाठवले पोस्टमॉर्टमसाठी
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, शिवाय आसपासच्या परिसरात कोणी तरूणी बेपत्ता तर नाहीये ना याचा तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...