आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोडीच्या उचलीपोटी अल्पवयीन मुलीचे अपहरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - तालुक्यातील खानापूर येथील पती-पत्नीस ऊस तोडीसाठी पैशाची उचल देऊन काम न केल्याच्या कारणावरून त्यांच्या १२ वर्षीय मुलीस पळवून नेल्याप्रकरणी डोंजातील तिघांविरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात रविवारी (दि.२३) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 
पती- पत्नीस ऊस तोडणीसाठी सचिन काळे, सुखदेव काळे व सागर काळे (रा.डोंजा) आदींनी ६० हजार रुपये उचल दिली होती. परंतु, या ऊसतोड मजूर असलेल्या दाम्पत्यास कामाच्या ठिकाणी सदरील तिघेजण त्रास देत असल्यामुळे कामावर न जाता हे दाम्पत्य परंड्याला आले होते. तिघांनी संगनमत करुन त्यांच्या १२ वर्षीय मुलीस गुरुवारी (दि.२०) सकाळी ११ च्या सुमारास शहरातील समतानगर येथून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...