आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे अपहरण करून डांबून ठेवत बलात्कार, तिघांना अटक, आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

जालना : जालना येथील १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला सेनगाव येथे डांबून ठेवण्यात आले. नंतर तिच्यावर सतत बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २३ दिवसांनंतर पोलिसांनी या मुलीची सुटका केली. तीन आरोपींना अटक केली असून यात दोन महिलांचा समावेश आहे. या मुलीची विक्री करण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

चंदनझिरा भागातील १३ वर्षांच्या मुलीचे अज्ञात लोकांनी अपहरण केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली होती. या मुलीचा व आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके तैनात केली होती. या मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी तिला फूस लावून पळवून नेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता या मुलीला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील एका शेतवस्तीवर डांबून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या शेतवस्तीवर छापा टाकून मुलीची सुटका केली. शिवाय तिला फूस लावून पळवून नेणाऱ्या दोन महिलांसह एका आरोपीस अटक केली आहे. दत्ता धनगर (सेनगाव, जि. हिंगोली) याने मुलीवर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले.

१३ नोव्हेंबर रोजी ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार चंदनझिरा ठाण्यात दाखल झाली. त्याच दिवशी या दोन महिलांनी तिला फूस लावून पळवले होते. या दोन्ही महिला बसस्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करतात असे पोलिसांनी सांगितले. या मुलीला त्यांनी मनमाड, औरंगाबाद, वाशिम व नंतर सेनगावला नेले होते.

दिव्यांग अविवाहितेचा खून, बलात्काराचाही संशय

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : भाचीसोबत घरात असलेल्या एका ४५ वर्षीय दिव्यांग महिलेचा शेजाऱ्यानेच खून केल्याचे शनिवारी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द येथे उघडकीस आले. दरम्यान, श्वानपथकाने माग काढल्यानंतर रितेश गजानन देशमुख याला पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली आहे. दरम्यान, या आरोपीविरुद्ध बलात्कारासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.