आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झटपट पैसे कमावण्यासाठी मुलीचे अपहरण; मोबाइल लाेकेशनवरून दोघांना बेड्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - झटपट  पैसे कमावण्यासाठी चिंचवड येथील एका बारा वर्षीय मुलींचे दोघांनी अपहरण करून तिच्या वडिलांना ५० लाखांची खंडणी मागितली. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आराेपींंच्या माेबाइल लाेकेशनवरून मुळशी तालुक्यातील नेरे येथील अपहरणकर्त्याच्या घरातून मुलीची सुखरूप सुटका करत दाेघांना अटक केली. माही अवध जैन (१२) असे सुखरूप सुटका झालेल्या मुलीचे नाव अाहे, तर नितीन सत्यवान गजरमल (२५, रा.नेरे, पुणे, मु. रा. देवगाव, परंडा, जि. उस्मानाबाद आणि जितेंद्र पप्पुराम बंजारा (२१, रा. थेरगाव, वाकड, पुणे) अशी अाराेपींची नावे अाहेत.  


जैन कुटुंबीय मूळ जयपूरचे असून नाेकरीनिमित्त ते चिंचवड येथील क्वीन्स टाऊन साेसायटीत वास्तव्यास आहेत. अवध जैन हे अायटी कंपनीत नोकरीला असून त्यांची पत्नी बँकेत आहे. त्यांची मुलगी माही गुरुवारी दुपारी चार वाजता शाळेच्या स्कूल बसमधून साेसायटीच्या गेटवर उतरली. त्यानंतर पेन अाणण्यासाठी ती जवळील दुकानात गेली असता त्या ठिकाणी रस्त्यावर दबा धरून बसलेल्या अाराेपींनी तिला जबरदस्तीने काळ्या काचा असलेल्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. दुकानदाराने ही गाेष्ट पाहिल्यानंतर त्याने कारचा पाठलाग केला, मात्र अपहरणकर्ते कार घेऊन पसार झाले.   

 

पोलिसांनी अशी केली मुलीची सुटका   
मुलीचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर जैन कुटुंबीयांनी पाेलिसांत तक्रार दिली. पिंपरी चिंचवडचे पाेलिस अायुक्त अार. के. पद्मनाभन यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीने तपास करण्याचे अादेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका औषधी दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीत  अपहरणकर्त्यांची कार दिसली. त्याअाधारे पाेलिसांनी शहराच्या विविध भागात नाकेबंदी करून गाडीचा शाेध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, रात्री अाठ वाजता माहीच्या वडिलांच्या माेबाइलवर अपहरणकर्त्यांनी फाेन करून मुलीच्या सुटकेसाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. तडजाेडीअंती १५ लाख रुपये देण्याचे  ठरले. त्यानंतर पोेलिसांनी मोबाइल लाेकेशन ट्रेस करून रात्री दीड वाजता नेरे येथून मुलीची सुखरूप सुटका केली. 

 

घर, कारचे पैसे फेडण्यासाठी अपहरण   
अाराेपी नितीन गजरमल व जितेंद्र बंजारा यांनी नेरे येथे एक घर व जुनी कार विकत घेतली हाेती. त्यामुळे त्यांना कर्ज झाले होते. हे  कर्ज फेडण्यासाठी  त्यांनी मुलीला पळवून नेण्याचा कट रचला. त्यानुसार, चिंचवड येथील क्वीन्स टाऊन साेसायटी येथून माहीचे अपहरण केले. दरम्यान, पोलिस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...