आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Girl Killed Her Father After He Stopped Her To Live In With Uncle

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलीची अब्रू वाचविण्यासाठी समाजाशी भांडला होता पिता, पण त्याच मुलीने वडिलांना दिला भयानक मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मेरठ (उत्तर प्रदेश) : परतापूर परिसरात वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीने काकाच्या मदतीने आपल्या वडिलांना भयानक मृत्यू दिला आहे. अल्पवयीन मुलगी आणि काका यांच्यात अवैध संबंध होते. दोघांनी पहिले एका हत्याराने वार करून पित्याल मृत्यूच्या दारात लोटले आणि नंतर रॉकेल टाकून जाळले. पोलिसांनी याप्रकरणात चकित करणारे अनेक खुलासे केले आहेत. 

 

काकसोबतच्या संबंधाला विरोध केल्यामुळे पाठवले यमसदनी

अल्पवयीन मुलगी पाच वर्षांची असाताना तिची आई वडिलांसोबतचे नाते संपवून माहेरी गेली होती. तेथून तिने आपल्या मुलीसोबत मथुरा गाठले आणि तेथे आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. मुलगी जवळपास 11 वर्ष तिच्यासोबत होती. मुलीने 6 महिन्यांपूर्वी आपल्या वडिलांना 'मी आईसोबत नाही राहू शकत, माझ्याकडे वाईट नजरेने पाहिले जाते' असे फोन करून सांगितले होते. यानंतर पिता आपल्या छोट्या भावासोबत मथुरेला गेले. पत्नीच्या प्रियकराने मुलीला घेऊऩ जाण्यास विरोध केला असता गावात बैठक बसवण्यात आली होती. बैठकीत मुलीने सांगितले की, ती तिच्या वडिलांसोबत राहील नाहीतर जीव देईल. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला परतापूर येथे आणले होते. 

 

मुलीला दोन काका असून एका काकाचे एक वर्षीपूर्वीच लग्न झाले आहे. पण तीन महिन्यातच त्याची त्याला सोडून गेली आहे. तर दुसऱ्या काकासोबत मुलीची जवळीकता वाढत होती. कालांतराने दोघांमध्ये अवैध संबंध सुरू झाले. ही बाब वडिलांना समजताच त्यांनी या गोष्टीचा विरोध केला आणि अनेकवेळा मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काकसोबतच्या संबंधाला विरोध करत असल्यामुळे एके रात्री दोघांनी मिळून वडिलांची हत्या केली. त्यानंतर घरापासून 150 मीटर दूर शताब्दीनगर येथे रिकाम्या प्लॉटवर नेऊन मृतदेहाला एका पोत्यात भरले आणि त्यावर रॉकेल टाकून जाळून टाकले. 

 

मुलीच्या दुसऱ्या काकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसात काका आणि अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.