आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री रडत होती मुलगी, वैतागलेल्या आईने ओठ आणि नाकाला घेतला चावा, मुलीला गमवावे लागले प्राण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेवदा. रुसमध्ये एक मुलीला सख्ख्या आईने टॉर्चर केले यामुळेच तिला जीव गमवावा लागला. मुलगी 6 वर्षांची होती. ती आजारी होती आणि रात्री उठून रडत होती. यावेळी वैतागलेल्या आईने मुलीला गप्प करण्याचा प्रयत्न केला. परंतू ती शांत न बसल्याने रागात तिचे ओठ आणि नाकाला चावा घेतला. या घटनेनंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी तिचे चेअकप करुन तिला यापुर्वीही टॉर्चर केल्याचे सांगितले.


डॉक्टर्स म्हणाले - यापुर्वीही केले आहे टॉर्चर 
- हे प्रकरण रेवदा टाउन येथील आहे. येथे तीन वर्षांपुर्वी कात्या सेप्सिवत्सेवा आपली आई ल्यूडमिलासोबत राहत होती. या मुलीला सेरेब्रल पाल्सी आजार होता. 
- आजारी असतानाच कात्या एका रात्री अचानक उठून रडू लागली. तिच्या रागावलेल्या आईने तिला मारहाण करुन शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतू ती अजुन जोरात रडायला लागली. 
- यानंतर ल्यूडमिलाने मुलीवर हल्ला केला. तिने रागात मुलीचा खालचा ओठ चावून घेतला. तिने नाकही चावण्याचा प्रयत्न केला, परंतू ती यशस्वी झाली नाही.
- या घटनेच्या अनेक दिवसांनंतरही तिने कात्याला डॉक्टरांकडे नेले नाही. मुलीला या जखमांमुळे प्रचंड त्रास होत होता. अनेक दिवसांनंतर ल्यूडमिलाने एंबुलेंस बोलावून तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. 
- डॉक्टरांनी मुलीचे पुर्ण चेकअप केले तेव्हा तिच्या शरीरावर काही जुन्या आणि काही नवीन जखमांच्या खुणा मिळाल्या. डॉक्टरांनी सांगितले की, तिला अनेक आजार झालेले आहेत.
- कात्यावर वर्षभर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु राहिले. तिला अनेक आजार असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी सांगितले की, तिची काळजी घेण्यात दुर्लक्ष झाल्यामुळे तिला अनेक आजार झाले आहेत. 

 

मुलीला दुस-या कुटूंबाने घेतले दत्तक
- हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात असताना कात्याला ब्लॅक सी रिजॉर्ट टाउनमध्ये राहणा-या अन्ना मकरोवाने दत्तक घेतले. तिची काळजी घेतली. या घटनेच्या जवळपास 3 वर्षांनंतर मुलीने याच आठवड्यात जीव सोडला. 
- लोकल मीडियानुसार, शेवटच्या काळात ती एका वर्षापासून मकारोवा कुटूंबासोबत राहत होती. येथे तिची चांगली देखरेख केली जात होती.
- तिला दत्तक घेणा-या अन्ना यांनी सांगितले की, आम्ही कात्याला सोडण्यास तयार नव्हते. आमच्यासोबत तिने खुप कमी वेळ घालवला परंतू आमच्या कुटूंबाने तिला विसरणे अशक्य आहे.
- ओठांना चावा घेतल्यानंतर कात्याच्या आईला 4 वर्षांची कोठडी सुनावली. तिच्या वडिलांनी तिच्या जन्मानंतरच कुटूंबासोबतचे नाते तोडले होते. नंतर ते कधीच यांच्या संपर्कात आले नाही.

 

बातम्या आणखी आहेत...