Home | National | Delhi | Girl made friendship with boy on Instagram and then robbed him

कंपनीच्या लीडरला युवतीसोबत मैत्री करणे पडले महागात, इंस्टाग्रामवरील मैत्रीनंतर दोघेही राहिले लिव-इनमध्ये, इमोशनल गेम खेळून मुलीने उद्ध्वस्त केले मुलाचे आयुष्य

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:03 AM IST

मुलीच्या मागणीवर पीडितने निवृत्त आईच्या पीएफमधून काढून दिले होते पैसै

 • Girl made friendship with boy on Instagram and then robbed him


  नोएडा : एका युवतीने इंस्टाग्रावर एक कंपनीच्या टीम लीडरसोबत मैत्री केली आणि त्याला 8 लाखांचा गंडा घातला. पैसे हडपण्यासाठी युवती अनेक महिने तरुणासोबत लिव-इन मध्ये राहिली होती आणि आपल्या वडिलांच्या आजाराचे कारण सांगत पैसे उकळत होती. गेल्या काही दिवसांपासून तिने 2 लाख रूपयांची मागणी केली असता युवकाने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर तरुणी युवकाला छेडछाडीच्या आरोपात फसवण्याची धमकी देऊन फरार झाली. आरोपामुळे परेशान झालेल्या युवकाने युवतीचा शोध घेतला असता तिचे इतर मुलाशी लग्न होणार असल्याचे त्याला समजले. सोबतच तिच्या परिवारातील कोणाचीही तब्येत खराब नव्हती. युवती खोटे कारण सांगून त्याच्याकडून पैसे उकळत होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने पोलिसांत युवतीविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.

  2017 मध्ये झाली होती मैत्री, वडिलांच्या प्रकृती ठीक नसल्याचे देत होती कारण

  पीडित युवक अनमोल सेक्टर-99 मध्ये राहतो. तो एका खासगी कंपनीमध्ये टीम लीडर पदावर कार्यरत आहे. त्याने सांगितले की, 2017 मध्ये इंस्टाग्रामवर एका युवतीला फॉलो केल्यानंतर दोघांनी एकमेकांचा नंबर घेऊन गप्पा मारण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघांमध्येही घट्ट मैत्री झाली. युवती गेल्या काही महिन्यांपासून युवकाच्या नोएडा येथील फ्लॅटमध्ये येऊन राहत होती. काही दिवस राहिल्यानंतर परत निघून जात होती. युवतीने आपल्या वडिलांची तब्येत खराब असल्याचे सांगत कधी 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊऩ काही महिन्यातच 8 रूपये घेतल्याचा युवकाने आरोप केला आहे. पुढे तो म्हणाला की, तिच्यावर विश्वास ठेवून सरकारी नोकरीतून निवृत्त झालेल्या आईच्या पीएफ खात्यातील पैसे दिला काढून दिले होते.


  युवकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देऊन फरार झाली युवती
  अनमोलने सांगितले की, नोव्हेंबर 2018 मध्ये युवतीने त्याच्याकडे पुन्हा एकदा 2 लाख रूपयांची मागणी केली. याआधी भरपूर पैसे दिल्यामुळे त्याने 2 लाख रूपये देण्यास नकार दिला. युवतीने अनेकवेळा मागणी करूनही पीडितने पैसे न दिल्यामुळे तिने अगोदर छेड़छाडीची तक्रार दाखल करून तुरूंगात पाठविण्याची धमकी दिला आणि नंतर अचानकपणे काहीच न सांगता बेपत्ता झाली. यानंतर अनमोलने युवतीबद्दल माहिती काढली असता, सप्टेंबर 2018 मध्ये तिचा दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा झाला असून दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचे त्याला समजले. याबाबत अनमोलने युवतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Trending