आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाकडून / आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाकडून तीन महिन्यापासून सतत विनयभंग 

Feb 12,2019 08:43:00 AM IST

धुळे- शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील अभय कल्याण केंद्राच्या शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेतील सातवीच्या विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केला. या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात विनयभंगासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

वर्षी येथे अभय युवा कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मुख्याध्यापक सुनील शिवाजी पवार यांनी तीन महिन्यापासून वेळोवेळी विनयभंग करत होते. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार मुख्याध्यापक पवारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

X