आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवस-रात्र नरबळीचाच करायची विचार; बॉयफ्रेंडला बेडवर बांधले, शारीरिक संबंध बनवताना केले 5 वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटनॅशनल डेस्क - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला फक्त आणि फक्त सीरियल किलर होण्याचा नाद लागला होता. रात्री-बेरात्री झोपेतून उठून किंवा सकाळी सुद्धा अंथरुणात ती आपल्या मोबाइलमध्ये फक्त नरबळीचे व्हिडिओ पाहायची. कुठल्याही परिस्थितीत नरबळी कसा देता येईल याचीच ती प्लॅनिंग करायची. आपला पहिला बळी म्हणून तिने तिच्याच बॉयफ्रेंडची निवड केली. तेही अतिशय खासगी क्षणांमध्ये असताना तिने आपल्या बॉयफ्रेंडला तीक्ष्ण हत्याराने 5 वेळा भोसकले. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात तिने आपला गुन्हा कबूल केला. त्याचवेळी प्रकरणातील बारकावे आणि घटनाचक्र समोर आला आहे.


त्या रात्री नेमके काय घडले?
> ही घटना 2017 मध्ये घडली आहे. त्यावेळी 19 वर्षीय जोई अॅडम्स हिच्यावर आपल्याच 18 बॉयफ्रेंड किरेन बेविकला 5 वेळा भोसकल्याचे आरोप आहेत. या प्रकरणातील खटला सुरू असताना जे काही समोर आले ते धक्कादायक आहे.

> त्या रात्री जोईने आपल्या बेविकला आपल्या घरी बोलावले होते. तसेच अख्खी वोडका बॉटल पिऊन संपवली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेली जोईने पिणे थांबवले नव्हते. याला कंटाळून बॉयफ्रेंड बेविक वरच्या खोलीत गेला. रात्री सुमारे 10 वाजता ती अचानक आपल्या बॉयफ्रेंडच्या खोलीत गेली. तिने आपल्या चेहऱ्यावर जोकरचा मेक-अप लावला होता. 
> बेविकला तिने विचारले, की 'मला असे पाहून तुला भिती वाटत नाही ना?' यावर बेविक म्हणाला, 'नाही. तू ताबडतोब तोंड धुवून ये. मला तुझा हा मेक-अप आवडला नाही.' ती खाली गेली आणि पुन्हा तशाच अवस्थेत वर आली. यावेळी ती बेविकच्या खोलीत आली तेव्हा तिने मोजकेच कपडे घातले होते. तसेच चेहऱ्यावर तोच जोकरचा मेक-अप होता. कोर्टात जोईने दिलेल्या जबाबानुसार, यावेळी तिच्या हातात चाकू होता. 


प्रियकराला विचारले Do You Love Me?
> त्याचवेळी तिने आपल्या बॉयफ्रेंडला सेक्स करण्यासाठी फोर्स केला. ती पुन्हा-पुन्हा बेविकला विचारत होती की तुझे हात बेडला बांधू का? आणि बेविक वारंवार तिला नकार देत होता. यानंतर तिने पुन्हा बेविकला विचारले, Do You Love Me? तू माझ्यावर खरंच प्रेम करतोस का? त्याने होकार दिला. तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर किमान उशी तरी ठेवू दे अशी विनंती तिने केली. यास तो नकार देऊ शकला नाही. 
> सेक्स करत असतानाच जोईने केरन बिवेकच्या तोंडावर उशी ठेवली. केरनचा फोन स्विच ऑफ करून गादीखाली ठेवले. तो काही पाहू शकणार नाही याची खात्री पटताच तिने आपल्यासोबत आणलेला धारदार चाकू घेत केरनवर एकानंतर एक सपा-सप 5 वार केले. हे सर्व काही जणू क्षणार्धात घडले आणि आपल्यासोबत नेमके काय घडले हे कदाचित केरन बेविकला कळालेही नसेल.

 

पोट, छातीवर केले 5 वार...
पोट, छाती हात आणि खांद्यावर चाकूचे 5 वार झाल्यानंतरही बेविक वाचला. बेडसह अख्ख्या खोलीत रक्तच रक्त होते. त्याने दुसऱ्या हाताने जोईला धक्का देऊन बेडवरून पाडले. फक्त बॉक्सरवर गंभीर जखमी अवस्थेत तो घरातून बाहेर निघाला. घराबाहेर जोईची मावशी बसली होती. त्याच मावशीने केरनला घरात घेतले. त्याच्या जखमांवर मलमपट्टी लावली. तसेच पोलिसांना फोन लावून घटनास्थळी बोलावले. अॅम्बुलेन्स घेऊन आलेल्या पोलिसांनी यानंतर बेविकला रुग्णालयात दाखल केले आणि आरोपी जोईला अटक केली. त्यावेळी मात्र तिने आपल्यावर लावलेला आरोप नकार होता. पण, जिवंत वाचलेल्या बेविकने कोर्टात आपल्यासोबत झालेला प्रसंग सांगितला.

 
नरबळी देण्याचे लागले होते वेड
जोईच्या मैत्रिणींनी सांगितल्याप्रमाणे, तिला नरबळीचे आणि निर्घृण खूनाचे व्हिडिओ पाहण्याचे व्यसन लागले होते. कॉलेजच्या लॅबमध्ये सुद्धा चाचण्यांसाठी ठेवलेले ह्युमन ऑर्गन ती अगदी खुशाल कापायची. तिला असे करण्यात मज्जा वाटायची. नरबळी देणे आणि सीरियल किलर होणे ही आपली फॅन्टेसी असल्याचे तिने सांगितले होते. या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच आपल्या बॉयफ्रेंडला तिने फोन आणि मेसेज करून नरबळीची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मात्र, बेविकने फारसे लक्ष दिले नाही. कदाचित ती मस्करी करत असेल असे म्हणून त्याने ती गोष्ट सोडली. कोर्टाने या प्रकरणात तिला दोषी ठरवले आहे. पोलिसांना तिच्या मोबाईलमध्ये विभत्स हत्या आणि रक्तरंजित असे 1800 फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सापडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...