आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांपासून तरुणीवर बलात्कार करत होता BJP नगरसेविकाचा डॉक्टर पती, पीडिता म्हणाली- मी 10वीत असल्यापासून डॉक्टर माझ्यावर करतोय शोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदिशा (एमपी) - विदिशा विधानसभेचे मीडिया प्रभारी आणि वॉर्ड क्रमांक 28 च्या नगरसेविका रुची सक्सेना तसेच शांता स्मृति फ्रॅक्चर हॉस्पिटलचे संचालक डॉ. पीयूष सक्सेनाविरुद्ध एका 22 वर्षीय तरुणीने शहर पोलिसांत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेचा आरोप आहे की, 8 वर्षांपासून डॉ. सक्सेना तिचे लैंगिक शोषण करत आहे. दुसरीकडे, गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. सक्सेनाला भाजपचे प्रदेश कार्यालय मंत्री सत्येंद्र भूषण सिंह यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे. तरुणीने पोलिस तक्रार दिल्यानंतर डॉक्टर फरार झाला आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले आहेत. 


सुनसान जागेवर बलात्कार करून फोटो काढले
मी सीएचे शिक्षण घेत आहे. डॉक्टर 2010 पासून माझे शारीरिक शोषण करत आहे. माझी बनावट फेसबुक आयडी बनवून मला त्रास दिला जात आहे. 10वीमध्ये असताना मी जेव्हा त्यांच्याकडे शिकायला जात होते, तेव्हापासून हे सर्व सुरू आहे. एकदा ते मला भोपाळवरून कारने रायसेनच्या वाटेवर घेऊन गेले. तेथे एका निर्मनुष्य जागेवर कार रोखून माझ्यावर बलात्कार केला. यानंतर त्यांनी माझे फोटो काढले. सन 2014 मध्ये मी विदिशाच्या बाहेर शिकायला गेले. 2015 मध्ये जेव्हा इंदूरला होते तेव्हा मला कॉल करून त्रास देऊ लागले. अशा अनेक घटनांमुळे मी त्रस्त झाले. तेव्हा मी माझ्या आईला सगळी घटना सांगितली. यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांत गेले. (जसे पीडितेने पोलिस तक्रारीत सांगितले तसे...)


काँग्रेस कार्यकर्त्यांची आरोपी डॉक्टरच्या घरासमोर घोषणाबाजी
हे प्रकरण तापल्यानंतर नगरपालिकाध्यक्ष आणि भाजप उमेदवार मुकेश टंडन यांनी पीडिता व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याची माहिती काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली. येथून मुकेश टंडन पीडितेच्या घरातून बाहेर निघताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. दुसरीकडे एक ग्रुपही डॉ. सक्सेनांच्या घरासमोर पोहोचला आणि घोषणाबाजी सुरू केली.

 

 

बातम्या आणखी आहेत...